Eknath Shinde, Balasaheb Thorat Sarkarnama
नगर

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून थोरातांनी सरकारचं सगळंच काढलं...

Manoj Jarange Patil : विधिमंडळाच्या अधिवेशनात मनोज जरांगे यांच्या आंदोलनांची एसआयटी चौकशीची घोषणा

Pradeep Pendhare

Nagar Political News : मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच सगेसोयऱ्यासह आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या आंदोलनाला काल जालना येथे हिंसक वळण लागले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा विषय गाजत असून,एसआयटी चौकशीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.यानंतर काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सरकारचे सगळेच काही काढले.

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा आहे. यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षणावर ठाम आहे.यातून पुन्हा आंदोलन सुरू केले. १७ दिवस बेमुदत उपोषण केले.आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले आहे. याचे पडसाद अधिवेशनात आज उमटले. यावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबईकडे येणारा मोर्चा नवी मुंबईत थांबल्यानंतर मध्यस्थी झाली आणि गुलाल उधळला गेला. मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही.आता एसआयटी चौकशी लावली जात आहे. हे कळण्यापलीकडे आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. मनोज जरांगेंचे आंदोलन हे शांततेत सुरू होते.शांततेच्या मार्गाने मोर्चे निघत होत.

लाखो लोक जमत होते.शांततेत उपोषण सुरू होते. जे उपोषण शांततेत सुरू होते, कोणालाही माहित नव्हते आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. महिला आणि मुलांना मारहाण झाली. यातून गदारोळ झाला. अचानक आंदोलन प्रकाशझोतात आले. यानंतर मनोज जरांगेच्या सभा व्हायला सुरूवात झाली. लाखोंच्या सभा झाल्या. सरकार आणि जरांगे यांच्यात संवाद सुरू होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईकडे मोर्चा निघाल्यावर तो नवी मुंबई येथे थांबवण्यात आला. तिथे मध्यस्थी झाली. गुलाल उधाळला गेला, नंतर पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ का आली, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील या मुद्यावरून विधिमंडळात आक्रमक झाले.महाराष्ट्रात जे काही होत आहे,त्याची चौकशी झालीच पाहिजे,अशी मागणी केली.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT