chhagan Bhujbal, Sharad Pawar sarkarnama
नाशिक

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांनी फेटाळला अभिषेक सिंघवी यांचा 'तो' दावा

Sharad Pawar भुजबळ म्हणतात शरद पवार गटाकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Sampat Devgire

Bhujbal Vs Sharad Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाने काल निर्देश दिले आहेत. त्यात शरद पवार यांचा फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाने अजित पवार गटाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख केला होता. न्यायालयात भुजबळ यांनी केलेले विधान त्यांनी सादर केले. ग्रामीण भागात मते मागताना शरद पवार यांचे फोटो आणि चिन्ह वापरावा, असे म्हटल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा दावा फेटाळला आहे.

मी असे विधान कधीही केलेले नाही, वकिलांना चुकीची माहिती देण्यात आलेली दिसते. त्यावरून त्यांनी हे विधान केले असावे, असे भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार तर्फे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या गुरुवारी झालेल्या सुनावणीतील न्यायमूर्तींच्या सूचनेवरून अजित पवार गटांमध्ये हा वाद सुरू झाला आहे.

याबाबत भुजबळ म्हणाले, आम्ही शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर शरद पवार यांनी येवला तसेच अन्य ठिकाणी सभा घेतल्या. त्यात मला टार्गेट करण्यात आले. त्यांनी कार्यकर्त्यांना भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मी सॉफ्ट टार्गेट वाटतो. त्यामुळे मला शरद पवार गटाकडून टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या घड्याळ या चिन्हाबाबत काय मत मांडायचे ते सर्वोच्च न्यायालयातील आमचे वकील मांडतील. त्याबाबत मी फारसे काही सांगू शकत नाही. मात्र, ग्रामीण भागात शरद पवारांचा फोटो दाखवा आणि मते मिळवा हे मी कधीही म्हणालेलो नाही. ते म्हणाले, मतदान करताना मतदान केंद्रात कुठे फोटो असतो का? असा प्रश्न करून अजून प्रचार करण्याची वेळच आलेली नाही. कुठलीही निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे तसा प्रश्नच उद्भवत नाही.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT