Bharati Pawar, Chhagan Bhujbal sarkarnama
नाशिक

Nashik constituency 2024 : भुजबळांची कोपरखळी : 'आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार'

Bharati Pawar महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार येत्या दोन मेस आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या संदर्भात त्यांनी आज भुजबळ यांची भेट घेतली.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: नाशिक लोकसभा मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ प्रमुख उमेदवार होते. मात्र उमेदवारीचा निर्णय प्रदीर्घ काळ लांबला. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय आता एक चिघळणारी जखम झाली आहे. त्यावर विरोधकांनी एवढेच सत्ताधारी आघाडीतील नेतेही खेद व्यक्त करू लागले आहेत.

या संदर्भात मंत्री भुजबळ यांना विचारणा केली असता, महायुती एक संघ आहे लवकर प्रचारात सर्व नेते उतरतील असे त्यांनी सांगितले. महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार येत्या दोन मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या संदर्भात त्यांनी आज भुजबळ यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, कदाचित तोपर्यंत महायुतीचा नाशिकचा उमेदवारदेखील ठरेल अशी अपेक्षा आहे.

नाशिक मतदारसंघातून भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता, त्यांनी महायुतीकडे अनेक चांगले चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे चांगल्या उमेदवारांतून चांगले उमेदवार निवडणे हे अवघड असते. कदाचित त्यामुळेच उशीर होत असेल.

मात्र आता येथे एक दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, अशी कोपरखळी छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावली. ते म्हणाले, मी जवळपास एक महिना वाट पाहिली. उमेदवारीसाठी अगदी चातकासारखी वाट पाहत होतो. मात्र महायुतीचे नेत्यांचे निर्णय होत नव्हता.

मग मी आणखी काय करायला पाहिजे होते?. त्यामुळेच मी स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता तरी लवकर उमेदवारीचा निर्णय होईल, अपेक्षा होती. मात्र, तसे घडताना दिसत नाही. याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली.

Edited By : Umesh Bambare

R.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT