Nashik Constituency 2024 : नाशिकच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी पर्याय गमविले?

Maharashtra CM Eknath Shinde News : शेवटच्या क्षणी उमेदवार देताना शिवसेनेच्या शिंदे गटाकडील पर्याय संपले
Shantigiri Maharaj, Eknath Shinde, Rajabhau waze
Shantigiri Maharaj, Eknath Shinde, Rajabhau wazesarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde Group News: नाशिक मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आता प्रचारासाठी अवघे १८ दिवस शिल्लक आहेत. मात्र, महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी स्पर्धा कशी होणार? हा चर्चेचा विषय आहे. नाशिकमधून महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाजे यांचा प्रचार सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत.

राजाभाऊ वाजे यांनी काल शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. वाजे यांची प्रतिमा आणि प्रभाव पाहून महायुती घाबरली आहे. त्यांना अद्याप उमेदवार मिळालेला नाही, अशी टीका या वेळी करण्यात आली. महाविकास आघाडीने केलेली टीका राजकीय आहे. मात्र, त्याला वास्तवाची किनारदेखील आहे.

महायुतीमध्ये नाशिकचा मतदारसंघ कोणाचा यावरील वाद अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे महायुतीतील हा गोंधळ शिवसेनेच्या शिंदे गटाला महागात पडण्याची चिन्हे आहेत. निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या १८ दिवसांत प्रचार संपणार आहे. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल त्याला, १८ दिवसांत सहा विधानसभा आणि वीस लाख मतदार असलेल्या मतदारसंघात प्रचार करणे मोठे आव्हान आहे.

Shantigiri Maharaj, Eknath Shinde, Rajabhau waze
Nashik Constituency 2024 : कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी भाजपला फटकारले; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुजरातसाठी काम करतात का?

अशा स्थितीत महायुतीच्या उमेदवाराची घालमेल होणे अटळ आहे. त्याचा फायदा विरोधकांना मिळेल. या पार्श्वभूमीवर नवीन चेहरा, मतदारांना फारसे परिचित नसलेल्या आणि प्रचार नव्याने कराव्या लागणाऱ्या उमेदवाराला हे आव्हान सोपे नाही. त्याचे नुकसान महायुतीच्या पक्षांना बसणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात उमेदवार कोण? यामध्येच निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, हे ठरणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळणार या अपेक्षेने मतदारसंघात दोन महिन्यांपूर्वीच प्रचार सुरू केलेला आहे. निवडणुकीसाठी सर्व तयारी केलेली आहे. प्रचार पत्रकांपासून तर मतदारसंघातील २८ जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांनी संपर्क दौरा केला आहे. अशा स्थितीत गोडसे यांचा प्रचार लवकर उभा राहू शकतो.

Shantigiri Maharaj, Eknath Shinde, Rajabhau waze
Nashik Loksabha Election : 'शांतिगिरीं'नी नाशिकची 'शांती' केली भंग? इच्छुकांची धडधड वाढली

सध्यादेखील त्यांचा प्रचार सुरूच आहे. याचा विचार करता शिंदे गटाने पक्षांतर्गत आणि युती अंतर्गत समन्वय निर्माण करून खासदार गोडसे यांना उमेदवारी देणे सोयीचे होऊ शकते. शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करीत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. शांतिगिरी महाराज यांचादेखील दोन आठवड्यांपासून प्रचार सुरू आहे. त्यांचा भर प्रामुख्याने त्यांच्या भक्त परिवारावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shantigiri Maharaj, Eknath Shinde, Rajabhau waze
Nashik BJP Vs NCP : नाशिकच्या देवळाली मतदारसंघावरून अजित पवार गट Vs भाजपमध्ये संघर्ष

त्याचा विचार करता पक्षीय उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे त्यांना सोपे नाही. मात्र, सद्यःस्थितीत शिंदे गटाने उमेदवारीचा निर्णय घेताना प्रचारासाठीचा अल्प कालावधी विचारात घेऊन विद्यमान खासदार गोडसे आणि शांतिगिरी या दोन पर्यायांचाच प्रामुख्याने विचार होऊ शकतो. याहून वेगळा नवा चेहरा दिल्यास महायुतीला ही निवडणूक सोपी नसेल असे बोलले जाते.

Edited By : Umesh Bambare

R

Shantigiri Maharaj, Eknath Shinde, Rajabhau waze
Shantigiri Maharaj Wealth: नाशिकमधून सर्वात पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांची संपत्ती किती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com