Devendra Fadnavis Sarkarnama
नवी मुंबई

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील विद्यापीठाच्यावतीने मानद 'डॉक्टरेट'..

Amol Sutar

Devendra Fadnavis News : जपानमधील विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करण्यात येणार आहे. जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ऑगस्टमध्ये जपान (Japan) दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती. कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबई (Mumbai) तील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.

2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्‍यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर 2018 आणि 2023 मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती. कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, दरवर्षी जपानमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी होते.

महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’ दिले आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT