Shrirang Barne, Bala Bhegde Sarkarnama
पिंपरी चिंचवड

loksabha election : मावळ लोकसभेसाठी महायुतीत पेच; बारणेनंतर भाजपचे भेगडेही तयारीत

Embarrassment in mahayuti Maval Lok Sabha: मावळ लोकसभेवरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट व भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे.

Uttam Kute

loksabha election : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे जागावाटप होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मावळ लोकसभेवरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट व भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे.

शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी २०२३ मध्येच उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या श्रेष्ठीने हिरवा कंदील दिल्याचे सांगून ते निवडणूक तयारीलाही लागले आहेत. त्यानंतर मावळातून, जर पक्षाने लढ म्हणून सांगितले, तर माझ्य़ापेक्षा माझे कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत, असे सांगत माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सोमवारी शड्डू ठोकला. यामुळे मावळचा महायुतीच्या उमेदवाराचा पेच मिटला नसल्याचे दिसून येते.

भाजपची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर भेगडे यांनी वरील वक्तव्य केले. त्याचवेळी पक्षाने सांगितले की संघटनेचे काम करायचे, तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मावळातून महायुतीचा उमेदवार या वेळी गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल, असा दावा त्यांनी केला, तर मावळातील खासदार हा महायुतीच्या विचाराचा राहणार असला तरी आमदार मात्र भाजपचाच असेल, असे पक्षाचे मावळ प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांनी या वेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मावळातून युतीचाच खासदार पुन्हा नक्की असेल, असा दावा बाळा भेगडेंनी केला. युतीच्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपला (bjp) मिळाली, तर आमचा, शिंदे गटाला मिळाली, तर विद्यमान खासदार बारणे उमेदवार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचा उमेदवार निवडून आणणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण तो मोदींसाठी हात वर करणारा असेल, असे ते म्हणाले. मावळची मागणी करायची की कसं याची स्ट्रॅटेजी ठरलेली नाही, ती ठरेल, तसेच उद्याच्या निवडणुकीत भाजपने काय करायचे ते योग्यवेळी सांगू, असेही त्यांनी सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

२४ लोकसभा आणि १५४ विधानसभांचा प्रवास

४८ लोकसभेची जबाबदारी पक्षाने मला दिली असून, २४ लोकसभा आणि १५४ विधानसभांचा प्रवास झाला असून, उर्वरित उद्यापासून सुरू करतोय. ते करताना पक्ष म्हटला लढा, तर माझ्यापेक्षा कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत आणि पक्षाचे काम करा सांगितले, तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी सावध भूमिका त्यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT