Police action in Maval  sarkarnama
पिंपरी चिंचवड

Maval Loksabha News : मावळमध्ये निवडणूक जोरात; आधी ५० लाख, आता तीस लाखांची रोकड जप्त...

Police Action मावळमध्ये चौथ्या टप्यात १३ मे रोजी मतदान असून तेथील प्र्चार सध्या शिगेला पोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेकादेशीर व्यवसाय धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.

Uttam Kute

Pimpari News : लोकसभा निवडणुकीतील उमेदवार हे बहूतांश व्यवहार रोखीने करीत असल्याने काळा पैसा मोठ्याप्रमाणात वापरला जातो. त्यामुळे त्यावर निवडणूक आय़ोगाचे खास लक्ष असते. त्यातूनच लोकसभेची निवडणूक जाहीर होताच मावळात पुणे-मुंबई एक्सप्रेस वे च्या ऊर्से टोलनाक्यावर पन्नास लाखांची बेहिशोबी रोकड २६ मार्चला पकडण्यात आली होती. त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातच पिंपरी-चिंचवडमधील निगडी चेकपोस्टवर तीस लाख रुपये एका आलिशान मोटारीतून काल (ता.१) जप्त करण्यात आले.

मावळमध्ये चौथ्या टप्यात १३ मे रोजी मतदान असून तेथील प्र्चार सध्या शिगेला पोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेकादेशीर व्यवसाय धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या (एसएसटी) हाती हे घबाड काल लागले. या पथकाने एका कारमधून रोकड जप्त केली आहे.

या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे त्यात कारवाईचा वा ती सापडलेल्यांना अटक करता येत नाही. पकडलेली रोख रक्कम आयकर विभागाकडे देण्यात आली आहे. या निवडणुकीत हाती आलेले हे दुसरे मोठे घबाड आहे. निवडणुकीसाठीच ही रक्कम नेण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

यापूर्वी हाती लागलेले पन्नास लाखाचे घबाड ही राज्यात निवडणुकीत जप्त करण्यात आलेली पहिली मोठी रक्कम होती. ती व काल पकडण्यात आलेले तीस लाख हे मावळ लोकसभा मतदारसंघातच सापडले आहेत. त्यातून तेथे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी तथा काळ्या पैशाचा वापर होत असल्याला दुजोरा मिळतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काल (ता.१) सायंकाळी निगडी येथील एसएसटी (SST) टीमने संशयास्पद मर्सिडीज बेंज या आलिशान मोटारीची (H12UV 5005)तपासणी केली असता बेहिशोबी २९लाख ५० हजार मिळून आले. त्याबाबत समाधानकारक खुलासा न करता आल्याने ती जप्त करण्यात आली.अधिक चौकशीत सदर दीपक रविंद्र वाणी यांची असल्याचे समजले. शहराच्या दुसऱ्या टोकाला दापोडी येथेही एसएसटी पथक तैनात आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT