Pune News: महायुतीत मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे (Srirang Barne) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती आणि आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पुढच्या आठवड्यात मावळात (Maval Lok Sabha Constituency 2024) केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत.
संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची ८ मे रोजी सांगवी येथे सभा होणार आहे. यावेळी शरद पवार, नाना पटोले हेही उपस्थित राहणार आहेत. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई , सुषमा अंधारे, ठाकरे गटातील नेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभेचे आयोजन केले आहे. शशिकांत शिंदे, चंद्रकांत हंडोरे यांच्याही सभा होणार आहेत. आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’ होणार आहेत.
तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता गोंविदा,उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह राज्य व केंद्रातील मत्र्यांच्या तोफा मावळमध्ये धडाडणार आहेत. ही सभा १० मे रोजी पिंपरी शहरात होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या फुटीनंतरच्या वातावरणात मतदार कोणाच्या मागे उभे राहतात, यावर मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
उमेदवार (पक्ष) - मतदान - टक्केवारी
श्रीरंग बारणे (शिवसेना) - ७,२०,६६३ - ५२.६२
पार्थ पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - ५.०४,७५० - ३६.८६
राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) - ७५,९०४ - ५.५४
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.