Maval Lok Sabha Constituency : भाजपचा मित्रपक्षांवर भरवसा नाय का? शिवसेना उमेदवार असलेल्या मावळात दिल्लीतून आले खास पथक!

BJP Delhi Team : भाजपने दिल्लीहून मावळमध्ये धाडलेल्या विशेष पथकाची तेथील महायुतीच्या उमेदवारालाच नाही कल्पना
Sanjogh Waghere, Shrirang Barne
Sanjogh Waghere, Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : 'अब की बार, चार सौ पार' घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एकेक जागा महत्त्वाची असल्याने सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. तशी माहिती तेथील महायुतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावतीने काल (ता.30) देण्यात आली. त्यानंतर भाजपचा आपल्या मित्र पक्षांवर भरवसा तथा विश्वास नाही का,अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान,असे पथक आल्याची माहितीच नसल्याचे आज (ता.1) बारणेंनी सांगितले. त्यामुळे या चर्चेने वेगळेच वळण घेतले आहे.

भाजपने महाराष्ट्रात स्वत:च्या नाही तर फक्त मित्र पक्षांच्याच मतदारसंघात हे पथक पाठविल्याने त्याबाबत वेगळी चर्चा रंगली आहे. केंद्रात सत्तेची व नरेंद्र मोदींच्या पंतप्रधापदाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे ते कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यातूनच त्यांच्या सर्वेक्षणात डेंजर झोनमध्ये असलेल्या आपल्याच नाहीतर मित्र पक्षांच्याही काही खासदारांचे तिकीट त्यांनी यावेळी कापले.

तर, काहींच्या उमेदवारीत ऐनवेळी बदल करण्यास भाग पाडले. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून पराभवाची धूसर शक्यता दिसताच त्या ठिकाणी मित्रपक्षांतील समन्वयासाठी आणि प्रचारात दुरुस्ती करण्याकरिता ही पथके रवाना केल्याचे समजले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Rohit Pawar On Ajit Pawar : आईची योग्यता काढणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर !

महायुतीतील मित्र पक्षांचे काही नेते व त्यांचे कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षांपोटी प्रचारापासून अलिप्त राहत आहेत किंवा विरोधात काम करत असल्याचे दिसत आहेत. त्यांची प्रत्यक्ष माहिती घेऊन त्यांना 'ब्लॅक लिस्ट' करणार आहे. त्यांना भविष्य़ात कुठलीही संधी देण्यात येणार नाही. तसेच त्याचा अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे.

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर ही 'मोदी की नजर'असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रत्येक कामाची नोंद ही 'टीम नमो' घेणार आहे. विजयासाठी करत असलेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची बारकाईने माहिती घेण्याचे काम ते करीत आहे.

दरम्यान, असे पथक आले आहे की कसे याबाबत माहिती नसल्याचे बारणे यांनी आज सांगितले. ते आल्याचे मीडियातूनच समजले, असे ते म्हणाले. तो निवडणुकीचा एक भाग असेल,अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच या पथकाने मला कसलीही विचारपूस केलेली नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मावळमध्ये पराभवाची चाहूल लागल्याने हे पथक आले असल्याचा आरोप विरोधकांनी लगेच सुरु केला. पण, तो खोडून काढताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा प्रतिहल्ला बारणेंनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Ramdas Athawale News : 'लोकशाही धोक्यात आली असती, तर मोदी...' ; रामदास आठवलेंचा विरोधकांना सवाल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com