Vishal Vijay Thori Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Crime News : देहूरोडमध्ये चाललंय काय? खंडणी, लाचखोरी आणि आता खून...

Dehu Area Local Shiv Sena (UBT) Leader's Son Killed : ठाकरे शिवसेना विभागप्रमुखाच्या मुलाचा देहूरोडमध्ये किरकोळ वादातून ठेचून निर्घृण खून

Uttam Kute

Pimpri Crime News : कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाजूक असलेल्या देहूरोडमध्ये सध्या चाललंय, तरी काय अशी परिस्थिती आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या तेथील दोन पोलिसांना काल (ता.५) बडतर्फ करण्यात आले, तर एक पीएसआय आणि एपीआय सस्पेंड झाले.

त्याजोडीने देहूरोडच्या एसीपींचे पाच लाखांच्या लाचखोरीत नाव आल्याने त्यांची कंट्रोलला बदली झाली. हे कमी की काय काल रात्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Shivsena) देहूरोड विभागप्रमुखाच्या एकुलत्या एका मुलाचा ठेचून खून करण्यात आला.

विशाल विजय थोरी (वय 24, रा. विकासनगर, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, तो ठाकरे शिवसेनेचे देहूरोड विभागप्रमुख आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर विजय थोरींचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांनीच याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात आज फिर्याद दिली.

पूर्वीच्या किरकोळ भांडणातून पाचजणांनी सिमेंटची कुंडी, गट्टू आणि लाकडी दांडके डोक्यात घालून विशालचा निर्घृण खून केला. त्यातील चौघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कॉलेज विद्यार्थ्याला गांज्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळल्याने देहूरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील (डीबी) पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ आणि त्यांच्या पाच साथीदारांविरुद्ध खंडणी आणि अपहऱणाचा गुन्हा गेल्या महिन्यात नोंद झाला. त्यात या दोन पोलिसांना अटक झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (VinayKumar Chaube) यांनी लगेच त्यांना निलंबित (सस्पेंड) केले होते.

तर काल (ता.५) त्यांना बडतर्फच (डिसमिस) केले. तेथील डीबीप्रमुख पीएसआय सोहम धोत्रे आणि सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वसंत विठ्ठल देवकातेला घरी बसवले, तर पाच लाखांच्या लाचखोरीत नाव आलेले देहूरोडचे एसीपी (सहायक पोलिस आय़ुक्त) मुगुटलाल भानुदास पाटील यांची बदली सीपींनी कंट्रोलला केली होती. त्यानंतर काल हा खून झाल्याने देहूरोडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहन राजेश देशमुख, चिक्या ऊर्फ सुयश विलास देशमुख,अमित वरगडे,वैभव ओनी आणि आदित्य अशी मारेकऱ्यांची नावे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार मृत विशालचा ६ महिन्यांपूर्वी सुयशशी किरकोळ वाद झाला होता.

काल तो पुन्हा झाला. त्यातून विशालवर हल्ला केला गेला. त्यात तो मरण पावला. पण, त्यापूर्वीच रोहनची आजी विजया देशमुख यांनी आपल्याला फोन करून तुमच्या मुलाने (विशाल) पुन्हा भांडण केल्याने आता त्याला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती, असे विजय थोरी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT