Pimpari News : शिरुरचा पेच सुटला; मावळात भाजपचा दावा कायम

Devendra Fadanvis शिवसेनेपेक्षा अधिक ताकद असल्याने ही जागा पक्षानेच लढवावी अशी मागणी मावळ भाजप कोअर कमिटीने मोशी येथे डिफेन्स एक्स्पोसाठी आलेल्या फडणवीसांकडे केली होती.
Eknath shinde, Devendra Fadanvis
Eknath shinde, Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : मावळमधून खासदारकीची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर तेथे युतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपनेही दावा ठोकला. मात्र, ताज्या घडामोडीत शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आपल्या वाट्याचा बाजूचा शिरुर राष्ट्रवादीला दिल्याने त्यांना आता मावळ शिवसेनेला सोडावा लागणार आहे. मात्र, भाजप मावळ लढविण्यावर अद्याप ठाम असल्याने ही जागा युतीत शिवसेना की भाजप लढणार हा सस्पेंस कायम आहे.

शिवसेनेपेक्षा अधिक ताकद (आमदार आणि नगरसेवक) असल्याने ही जागा पक्षानेच लढवावी अशी मागणी मावळ भाजप कोअर कमिटीने मोशी येथे डिफेन्स एक्स्पोसाठी आलेल्या फडणवीसांकडे केली होती. त्यानंतर त्यांनी विधीमंडळात मुंबईत त्यांची काल (ता.२८) पुन्हा भेट घेऊन पुन्हा ही मागणी रेटली. तर मावळच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या कर्जत येथे (जि.रायगड) गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी परवा (ता.२७) घेतलेल्या मेळाव्यातही ही मागणी करण्यात आली.

त्यावेळी तुमच्या भावना वरिष्ठांकडे पोचवतो आणि जागावाटपावेळी त्यावर चर्चा घडवून आणतो,असे आश्वासन सावंतांनी यावेळी दिले. मावळ भाजपने लढावी,अशी मागणी असली,तरी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करू. मोदींना पंतप्रधान करण्याासाठी त्याला निवडून आणू, मग ते बारणेही का असेना,असे ही मागणी केलेल्या मावळ भाजप कोअऱ कमिटीने म्हटले आहे.

Eknath shinde, Devendra Fadanvis
Pimpari News : हिंदूविषयी वादग्रस्त वक्तव्य : कॉंग्रेस नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

त्यामुळे ही जागा पक्षाला मिळेल याचा पूर्ण आत्मविश्वास त्यांनाही दिसत नाही.त्यातूनच त्यांनी तेथील संभाव्य इच्छूक कोण हे जाहीर न करण्याची खबरदारी घेतली. मग,त्यांची ही प्रेशर टॅक्टिस कशासाठी चालली आहे,याची आता चर्चा सुरु झाली आहे.दुसरीकडे आपली उमेदवारी फिक्स असल्याने बारणे यांनी प्रचारालाही सुरवात केली आहे. ते मेळावे घेऊ लागले असून त्यात ते आपणच उमेदवार असल्याचे सांगत आहेत.

जागा आणि उमेदवारीच्या बाबतीत आघाडीच्या तुलनेत युतीत शिरुरच्या नेमकी उलट स्थिती मावळमध्ये आहे. शिरुरला आघाडीकडून विद्यमान खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांची उमेदवारी फिक्स झाली आहे. त्यामुळे त्यांनी फिरण्यास सुरवात केली आहे. तर, मावळची जागा आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पक्की झाली आहे. तेथून त्यांचे उमेदवार हे नुकतेच अजित पवार राष्ट्रवादीतून आलेले पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील असण्याची दाट शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath shinde, Devendra Fadanvis
Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले; 'ज्यांनी बोटाला धरून चालवलं, त्यांच्याशी...'

कारण ते ही मतदारसंघात पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरू लागले आहेत.आदित्य ठाकरेंनी त्यांच्यासाठी दोनदा मावळचा दौराही करून रणशिंगही फुंकले आहे.त्याच्या नेमके उलट युतीत शिरुर व मावळ कोणी लढवायची यावरून आतापर्यंत रस्सीखेच सुरु होती. शिरुरला तो मिटला. पण, तेथे उमेदवार कोण हा सस्पेंस राहिला आहे.तर,मावळात भाजप आणि शिवसेना दोघांनीही दावा केल्याने या जागेचा तिढा तूर्त मिटलेला नाही.

Edited By : Umesh Bambare

Eknath shinde, Devendra Fadanvis
Shrirang Barne: पिंपरी-चिंचवडच्या विकासाला दिशा देणारे श्रीरंग बारणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com