Kumar Ashirwad Sarkarnama
प्रशासन

Voter List : सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदारांचे भवितव्य 37 लाख मतदारांच्या हाती; विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 August : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी आज (ता. 30 ऑगस्ट) प्रसिद्ध झाली. जिल्ह्यात एकूण 37 लाख 63 हजार 789 मतदार आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे 6 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण 75 हजार 824 मतदार वाढले आहेत.

दरम्यान, सर्वाधिक 3 लाख 74 हजार 536 मतदार हे अक्कलकोट मतदारसंघात (Akkalkot Constituency) असून सर्वांत कमी म्हणजे 3 लाख 22 हजार 240 मतदार हे सांगोला मतदारसंघात आहेत. आपले नाव अंतिम मदार यादीत आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी केले आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा निवडणूक कार्यालयाने आज प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत एकुण 37 लाख 63 हजार 789 इतकी मतदार संख्या असून यामध्ये पुरूष-19 लाख 35 हजार 979, तर महिला- 18 लाख 27 हजार 508 आणि इतर 302 मतदारांचा समावेश आहे. ता. 6 ऑगस्ट रोजीच्या प्रारूप मतदार यादीत एकुण 36 लाख 92 हजार 409 इतके मतदार होते. यात पुरूष 19 लाख 8 हजार 146, महिला 17 लाख 83 हजार 966 व इतर-297 मतदारांचा समावेश होता. मात्र गेल्या चोवीस दिवसांत 75 हजार 824 मतदार वाढले आहेत.

सोलापूर जिल्ह्याची विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेली अंतिम मतदार यादी (विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्र संख्यानिहाय आकडेवारी )

करमाळा : एकुण 3 लाख 24 हजार 35, पुरुष 1 लाख 69 हजार 390, महिला 1 लाख 54 हजार 633 अन्य 12 , मतदारांची वाढ -4737 झाली. 347 मतदान केंद्र आहेत.

माढा : एकुण 3 लाख 44 हजार 547, पुरुष एक लाख 80 हजार 547, महिला एक लाख 63 हजार 997 अन्य 3 तर मतदार संख्येत झालेली वाढ 5 हजार 339 तसेच मतदान केंद्र संख्या 355 आहे.

बार्शी : एकुण 3 लाख 27 हजार 657, पुरुष एक लाख 69 हजार 100, महिला एक लाख 58 हजार 516 अन्य 41 तर झालेली वाढ 4719 तसेच मतदान केंद्राची संख्या 333 इतकी आहे.

मोहोळ (अ. जा राखीव) : 3 लाख 25 हजार 999, इतकी मतदार संख्या असून मतदान केंद्राची संख्या 336 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 70 हजार 840 महिला एक लाख 55 हजार 151 अन्य आठ तर मतदारांची झालेली वाढ 4762.

सोलापूर शहर मध्य : 3 लाख 39 हजार 608 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्राची संख्या 304 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 67 हजार 662, महिला एक लाख 71 हजार 894 अन्य 52 तर वाढ झालेल्या मतदारांची संख्या 9947.

अक्कलकोट : 3 लाख 74 हजार 536 एकूण मतदार असून मतदान केंद्राची संख्या 390 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 92 हजार 819, महिला एक लाख 81 हजार 676 अन्य 41. मतदार संख्येत झालेली वाढ 10171.

सोलापूर दक्षिण : 3 लाख 72 हजार 553 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 362 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 91 हजार 610, महिला मतदार एक लाख 80 हजार 905 अन्य 38 तर मतदार संख्येत झालेली वाढ 10566.

पंढरपूर : 3 लाख 65 हजार 725 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 357 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 87 हजार 889, महिला एक लाख 77 हजार 810 अन्य 26 तर मतदार संख्येत झालेली वाढ 5874.

सांगोला : 3 लाख 22 हजार 240 मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 305 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 67 हजार 777 महिला एक लाख 54 हजार 458 अन्य 5 तर मतदार संख्येत झालेली वाढ 6619.

माळशिरस (अ. जा राखीव) : 3 लाख 44 हजार 221 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्राची संख्या 345 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 78 हजार 147, महिला एक लाख 66 हजार 43 अन्य 31 तर मतदार संख्येत झालेली वाढ 4891.

मतदानात केंद्रात 124 ने वाढ

जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघात 3723 मतदान केंद्र असून लोकसभा निवडणुकीत 3617 मतदार केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या 3723 झालेली आहे. एकुण 3723 मतदान केंद्रापैकी शहरी 1177 व ग्रामीण भागामध्ये 2546 मतदान केंद्राचा समावेश आहे.

मतदारांनी आपली नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी. तसेच, ज्या नागरिकांची अजूनही मतदार यादीमध्ये नावे नसतील त्यांनी निरंतर प्रक्रियेमध्ये नाव नोंदणी करू शकतात असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून मतदार यादीत नाव नोंदणी करू शकता. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेल्या अथवा काही दुरूस्ती असल्यास संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT