Election commission-voter id Sarkarnama
प्रशासन

Lok Sabha Election Administration News : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? नसेल तर काळजी करू नका, 'असा' घ्या शोध !

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकीत मतदान करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलली आहेत. मतदार यादीत नावे तसेच मतदान केंद्र शोधताना होणारी तारांबळ टाळण्यासाठी आता निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्घ करून दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने नियोजन केले आहे. मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

या मतदार सहाय्यता कक्षात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडविता येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या या मदत कक्षामुळे मतदारांना स्वत:चे नाव आणि मतदान केंद्र सापडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Collector) व्यक्त करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी अधिकृत सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे (Pune) जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, पुणे, मावळ तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. बारामतीचे मतदान 7 मे रोजी होणार आहे. तर पुणे, मावळ, शिरूर यांचे मतदान 13 मे रोजी होणार आहे.

या सर्व मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू आहे. मतदानासाठी अधिकाधिक नागरिकांनी बाहेर पडावे, यासाठी जनजागृती देखील केली जात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

वेबसाईट तसेच मोबाईल अॅप मध्ये देखील शोधता येणार आपले नाव..

मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मतदार चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून मतदारांनी ही माहिती मिळविण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिरणाऱ्या चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मतदारांना भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येणारा 1950 क्रमांकावर मतदार क्रमांक पाठविल्यास 15 सेकंदात मतदार चिठ्ठी मिळेल असा संदेश पूर्णत: चुकीचा असून नागरिकांनी भारत निवडणूक आयोगातर्फे किंवा प्रशासनातर्फे यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा. नागरिकांनी असे संदेश अग्रेषित करू नये. चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विधानसभा निहाय सुरू करण्यात आलेल्या मतदान मदत कक्षातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक...

बारामती लोकसभा मतदारसंघ

बारामती विधानसभा सचिन निकम - 8668278718

दौंड विधानसभा बालाजी सरवदे - 9421423295

इंदापूर विधानसभा इम्रान जमादार -9890176156

पुरंदर विधानसभा ओंकार कदम -7758833378

भोर विधानसभा प्रमोद खोपडे - 9096353103

खडकवासला विधानसभा वैभव मोटे - 8055445191

शिरूर लोकसभा मतदारसंघ

हडपसर विधानसभा सपना रहाटे - 7741907356

भोसरी विधानसभा वैभव बर्डे - 8446516864

शिरूर विधानसभा सदाशिव सावंत - 7020875545

खेड-आळंदी विधानसभा मयूर तनपुरे - 8308212990

जुन्नर विधानसभा स्वप्नील दप्तरे - 8668987069

आंबेगाव विधानसभा शुभम गाडेकर - 7972210166

पुणे लोकसभा मतदारसंघ

कोथरुड विधानसभा सुधीर सणस - 8999370680

शिवाजीनगर विधानसभा गोकुळ गायकवाड - 9623893839

पर्वती विधानसभा ओंकार माने - 9359929545

कसबा विधानसभा वैभव जंगम -8888365360

कँन्टोन्मेंट विधानसभा टी. एस. पांगारे -8792186684

वडगावशेरी विधानसभा रवि जाधव - 7447721212

मावळ लोकसभा मतदारसंघ

मावळ विधानसभा विशाल ओहळ - 7387998232

चिंचवड विधानसभा अनिल कुदळे - 9922535234

पिंपरी विधानसभा रोहित परदेशी - 7709510723

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT