Pune Collector Suhas Diwase सुहास दिवसे  Sarkarnama
प्रशासन

Pune Collector News : पोलिस कमिशनर, विभागीय आयुक्तांनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा नंबर; देशमुखांची बदली,'हे' असणार नवे कलेक्टर

Pune News Collector Suhas Diwase : पुण्याचे नवे जिल्हा अधिकारी आता सुहास दिवसे...

Chetan Zadpe

Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. शिंदे सरकारकडून राज्यात आयपीएस आणि आयएएस ‌अधिकाऱ्यांच्या‌ बदल्यांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांचीही बदली करण्यात आली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी राजेश देशमुख वर्णी लागली आहे. (Latest Marathi News)

पुण्याचे कलेक्टर राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जाणारे आयुक्त सुहास दिवसे यांची कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर राजेश देशमुख यांना सुहास दिवसेंच्या पूर्वीच्या जागी क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पद देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून राजेश देशमुखांच्या बदलीची चर्चा होतीच. अखेर दिवसेंना आता मेनस्ट्रीममध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळचे असल्याने दिवसे यांना ही मोठी संधी मिळाल्याचं बोललं जात आहे.

सुहास दिवसेंचा क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पदाचा कार्यकाळ संपला होता, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा होती. शिवाय ते पुणे महापालिका आयुक्त होतील, असंही बोललं जात होतं. मात्र, त्यांना अजितदादांनी कलेक्टर पदावर बसवलं आहे.

ठाकरे सरकारच्या काळात दिवसेंकडे पीएमआरडीएच्या आयुक्त पदाची जबाबदारी होती. तेव्हाही अजित पवारांमुळे त्यांना हे पद मिळालं होतं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि त्यांना क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पद सोपवण्यात आलं. मात्र, आता अजितदादांना दिवसे यांना पुण्याच्या कलेक्टरपदी बसवून एकप्रकारे पुन्हा मेनस्ट्रीमध्येच आणलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT