Rashmi Shukla DGP Sarkarnama
प्रशासन

Rashmi Shukla DGP : दुर्मिळ योगायोग; मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक दोघेही एकाच बॅचचे अधिकारी!

उत्तम कुटे

Police News : अपेक्षेनुसार राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) म्हणून रश्मी शुक्ला यांची राज्य सरकारने काल (ता.४) नियुक्ती केली. त्यामुळे मुंबईचे पोलिस आयुक्त (सीपी) विवेक फणसळकर हे अतिरिक्त कारभार देण्यात आलेले औटघटकेचे डीजीपी ठरले. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार फक्त चार दिवस राहिला. दरम्यान, शुक्ला पर्मनंट डीजीपी झाल्याने राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पातळीवर खांदेपालट होण्याची दाट शक्यता आहे. (Latest Marathi News)

शुक्लांच्या नेमणुकीमुळे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि त्या या एका बॅचच्या अधिकारी ठरल्याचा दु्र्मिळ योगायोग जुळून आला आहे.करीर हे 1988 च्या आयएएस बॅचचे, तर शुक्ला त्याच वर्षीच्या आय़पीएस बॅचच्या अधिकारी आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन शुक्ला यांची ही नियुक्ती महायुती सरकारने केली आहे. त्यासाठी त्यांना केंद्रातील भाजप सरकारची मदत झाली. कारण यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळून शुक्ला केंद्रात प्रतिनियुक्तीवर (डेप्यूटेशन) गेल्या होत्या. तेथून त्यांना केंद्राने राज्याच्या विनंतीवरून तातडीने मुक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुक्ला या पहिल्या महिला डीजीपी आहेत. त्या निवृत्त होण्यास दीड वर्ष बाकी आहे. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंतही त्या पदावर राहणार आहेत.त्यांच्या अगोदरचे डीजीपी रजनीश शेठ हे साडेदहा महिने त्या पदावर होते. तेच 2021 मध्ये 18 मार्च ते 10 एप्रिल असे 25 दिवस हंगामी डीजीपी होते.

सरकारनामाची बातमी खरी ठरली -

फणसळकर यांच्याकडे डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार देऊन राज्य सरकारने शुक्लांचा डीजीपी पदी येण्याचा दरवाजा उघडा ठेवला आहे, अशी बातमी सरकारनामाने 31 डिसेंबरला दिली होती. ती चार दिवसांतच खरी ठरली. तर, 29 डिसेंबरला दिलेल्या बातमीत शुक्ला या राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतील अधिकारी असल्याने डीजीपी पदासाठी त्यांचे पारडे जड असल्याचे सरकारनामाच्या या बातमीतही म्हटले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT