ED Officer Arrested Sarkarnama
प्रशासन

ED Officer Bribe Case : ईडीच्या अधिकाऱ्याने मागितली तब्बल 3 कोटींची लाच; पुढे काय घडलं ?

Sudesh Mitkar

Pune News : केंद्र आणि राज्य सरकार ईडीचा वापर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतात. मात्र, या आरोपाला भाजप नेत्यांकडून कडाडून विरोध केला जात आहे. याचदरम्यान, राजस्थाननंतर तामिळनाडूच्या अंकित तिवारी नावाच्या एका कथित ईडी अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेतल्याची माहिती ताजी असतानाच आता तामिळनाडूतही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तामिळनाडूमध्ये एका ईडीच्या (ED) अधिकाऱ्याने तब्बल 3 कोटींची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर हा सौदा 50 लाखांवर ठरला. त्यातील २० लाखांचा दुसरा हप्ता घेताना अटक करण्यात आली आहे. राजस्थानपाठोपाठ आता तामिळनाडूत ही दुसरी घटना घडली आहे. 

विरोधकांकडून मोदी सरकारवरील केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या गैरवापराच्या आरोपाला यामुळे पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात इंडिया आघाडीकडून हा मुद्दा उचलून धरणार असल्याचेही बोलले जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलनाचा टेंभा मिरवणाऱ्या ईडीच्या बुडाखाली अंधार असल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र आणि राज्य सरकार ईडीचा वापर करत विरोधकांवर दबाव आणण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतात. या पार्श्वभूमीवर राजस्थाननंतर तामिळनाडूच्या अंकित तिवारी नावाच्या एका कथित ईडी अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. (Modi Government)

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB) पथकाने आठ किमी फिल्मी स्टाइल पाठलाग करून या अधिकार्‍याला पकडले आहे. यानंतर पोलिसांनी दुराई येथील ईडीच्या कार्यालयावर तसेच लाचखोर अधिकार्‍याच्या घरावर छापे  टाकले आहेत.

काय आहे प्रकरण ?

या ईडी अधिकाऱ्याने अटक टाळण्यासाठी डॉक्टरकडे 3 कोटी रुपयांची लाच मागितली होती.  वाटाघाटी करून 50 लाखांचा सौदा ठरला. त्यानंतर  डिंडीगुल येथे डॉक्टरच्या घरी पैसे घेण्यासाठी अंकित तिवारी आला होता. हा प्रकार डॉक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवला.

पोलिसांची चाहूल लागताच तिवारी याने पळ काढला. त्यानंतर आठ किमीच्या पाठलागानंतर पोलिसांनी तिवारीच्या मुसक्या आवळल्या. तिवारीच्या कारमधून 500 रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग जप्त करण्यात आली असून,  त्यामधून २0 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.  

(Edited By Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT