PDCC Bank Case-Rohit Pawar Sarkarnama
पुणे

PDCC Bank Case : PDCC बॅंक मॅनेजरवरील कारवाई ही निव्वळ धूळफेक, ‘ते’ फुटेज सार्वजनिक करा; रोहित पवार आक्रमक

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वेल्हे शाखा ही 6 मे रोजी रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात आली होती. या बॅंकेतून पैसे वाटप झाल्याचा आरोप करत व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला हेाता. तसेच, निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यानुसार आयोगानं वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 11 May : बारामती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक उघडी ठेवण्यात आली होती. त्याबाबतचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला असून ही कारवाई निव्वळ धूळफेक असून त्या रात्रीचं व्हिडिओ फुटेज सार्वजनिक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वेल्हे शाखा ही 6 मे रोजी रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात आली होती. या बॅंकेतून पैसे वाटप झाल्याचा आरोप करत व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला हेाता. तसेच, निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यानुसार आयोगानं वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पीडीसीसी बॅंकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावरील निलंबनाच्या कारवाईवर आमदार रोहित पवार यांनी नापसंती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही निव्वळ धूळफेक आहे. मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले, या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसंच, त्या रात्रीचं CCTV फुटेजही सार्वजनिक झालं पाहिजे.

बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप आहे. तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांन पुन्हा केली आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात थेट लढत झाली. त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची नजर बारामतीकडे होती. त्यमुळे मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींकडे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे बारीक लक्ष होते. त्यातूनच रोहित पवार यांनी पीडीसीसी बॅंकेच्या वेल्हे शाखेतील प्रकार पुढे आणला होता.

याबाबतची तक्रार येताच निवडणूक आयोगाने बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे बँकेतील सीसीटीव्हीतील फुटेज निवडणूक आयोगाकडून तपासण्यात आले. त्या व्हिडिओमध्ये 40 ते 50 कर्मचारी बँकेच्या आतमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे आयोगानं व्यवस्थापकार निलंबनाची कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT