Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Maharashtra wildlife transfer: महादेवी हत्तीणीनंतर आता महाराष्ट्रातून 'हा' चर्चेतला प्राणी जाणार लवकरच वनताऱ्यामध्ये; अजितदादांनी दिली माहिती

Political News : या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदीची उपायोजना करण्यात येणार आहे. तसेच सव्वाशे बिबट्यांना एका ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवण्यात येणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : कोल्हापूरमधील नांदणी गावातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूरमधील जनतेने याला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता महादेवी हत्तीणीला परत आणण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

वनतारा हा प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांच्या माध्यमातून चालवला जातो. आता या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातून आणखी काही प्राणी पाठवले जाणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये मानव आणि बिबट संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. याबाबत बुधवारी बैठक घेतली. याबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली असून गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्यांचे हल्ले वाढल्याचे समोर आले असून यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.

या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदीची उपायोजना करण्यात येणार आहे. तसेच सव्वाशे बिबट्यांना एका ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी बिबटे पकडण्यासाठी निधी देण्याचा आश्वासन दिले आहे. त्यासोबतच हे बिबटे पकडल्यानंतर त्यातील 50 बिबटे हे वनतारा या प्रकल्पामध्ये पाठवण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

पकडलेल्या बिबट्याला ठेवण्यासाठी फॉरेस्टची जागा आवश्यक असणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला सादर करावा लागणार असून त्याला मंजुरी देण्यात येईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बिबट्याचे संकट जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर आणि आता हवेलीपर्यंत हे बिबटे पाहायला मिळत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या कधी झाली नव्हती आणि हे मोठं संकट आता येथील नागरिकांवर ओढवले आहे.

हे बिबटे ऊसामध्ये राहतात. त्यांनतर लहानाचे मोठे त्या उसामध्ये झालेले आहेत. त्यामुळे त्याचा जंगलात संबंध राहिला नाही. त्यामुळे त्यांना जंगलात सोडले तरी ते त्याठिकाणी राहू शकत नाहीत. ते उसातच राहतात आणि तिथून बाहेर पडून परिसरातील कुत्री, मांजर, कोंबड्या शेतकऱ्यांच्या जनावरांवर आणि वेळप्रसंगी शेतकऱ्यांवरती देखील हल्ला करत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी संगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT