Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

VSI Meeting : अजितदादा, वळसे पाटलांनी शरद पवारांसोबत एकत्र येणे टाळले...

Ajit Pawar News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष , राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री तथा व्हीएसआयचे सदस्य अजित पवार हे दोन्ही नेते पुण्यात असूनही बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत एकत्र येणे टाळले आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र येणार होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे आज (ता. 10 मार्च) पुण्यात होते. मात्र, त्यांनी ‘व्हीएसआय’च्या कार्यक्रमाला न जाणे पसंत केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय VSI) नियामक मंडळाची बैठक मांजरी येथील संस्थेच्या मुख्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मााजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे आणि अन्य सदस्यही बैठकीला उपस्थित आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री तथा व्हीएसआयचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) हे दोन्ही नेते पुण्यात असूनही बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे.

व्हीएसआयच्या मागील बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांनी त्यावेळीही शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर जाणे टाळले होते. मागील बैठकीला गेलेले वळसे पाटील आणि अजितदादा यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली आहे.

दरम्यान, भाजपसोबत गेल्यापासून अजित पवार आणि शरद पवार हे बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. मात्र, त्यांच्यामध्ये कोणतेही संभाषण झाले नव्हते. त्यामुळे आजच्या ‘व्हीएसआय’च्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या बैठकीला तरी अजितदादा शरद पवारांसोबत एकत्र येणार का, याची उत्सुकता होती. मात्र, दादांनी आजच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT