Khed Politics : मोहिते-बुट्टे पाटलांचे व्यासपीठावर गुफ्तगू; पण कार्यकर्त्यांच्या मनाची घालमेल!

Dilip Mohite-Sharad Butte Patil News : बुट्टे पाटील हे राष्ट्रवादीत असल्यापासून त्यांचा आणि आमदार मोहिते यांचा छत्तीसचा आकडा आहे. काही प्रकरणांत तर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात होते.
Dilip Mohite-Sharad Butte Patil
Dilip Mohite-Sharad Butte PatilSarkarnama
Published on
Updated on

Khed News : खेड तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक आमदार दिलीप माेहिते आणि भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे नेते एकत्र येत आहेत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत हे नेते आपल्यासाठी एकत्र येणार काय, असा सवाल यानिमित्ताने कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.

आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील (sharad Butte Patil) यांच्या उपस्थितीत खेड (Khed) तालुक्यातील वासुली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन झाले. बुट्टे पाटील हे राष्ट्रवादीत असल्यापासून त्यांचा आणि आमदार मोहिते यांचा छत्तीसचा आकडा आहे. काही प्रकरणांत तर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Mohite-Sharad Butte Patil
Kolhapur Loksabha Constituency : शाहू महाराजांच्या उमेदवारीवर मंत्री खाडे म्हणाले, ‘जिथं मोदी आहेत, तिथं मुमकीन काही नाही'

अजित पवार यांच्या महायुती प्रवेशाने राज्याबरोबर जिल्हा जिल्ह्यातील राजकारण पार बदलून गेले आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे, कायम कुरघोडीचे राजकारण करणारे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे मोहिते आणि बुट्टे हे वासुली येथील कार्यक्रमात एकमेकांशी गुजगोष्टी करताना दिसले. व्यासपीठावर हे दोन नेते एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत होते, त्यावेळी खाली बसलेले कार्यकर्ते हतबलपणे हे सर्व पाहत होते. यातील काही जण तर ‘नेत्यांचे नाही; पण आपलंच काहीतरी चुकतंय?’ असे बोलत होते.

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कदाचित युती टिकू शकेल. पण, त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही महायुती टिकली नाही तर हेच नेते कार्यकर्त्यांना एकमेकांविरोधात लढवतील. शरद बुट्टे पाटील यांचा वाकी-पाईट हा जिल्हा परिषद गट आहे. मात्र, मोहिते आमदार झाल्यापासून त्यांना हा गड सर करता आलेला नाही, तर विधानसभेला मोहिते यांच्या विरोधात पराभव झाल्याचे शल्य बुट्टे यांना नक्कीच असणार आहे.

Dilip Mohite-Sharad Butte Patil
Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांशी गद्दारी केलीय; मनोज जरांगेंनी तोफ डागली

महायुतीत भाजप, राष्ट्रवादीसोबत शिवसेना (शिंदे गट) सामील आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्याशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांचे फारसे सख्य नाही. बाजार समितीत मोहितेंच्या विरोधात झालेल्या पराभवाचे दुःख त्यांच्या मनात कायम असणार आहे. त्यामुळे आता नेते एकत्र आले असले तरी आगामी काळात ते एकत्र राहतील, याची शाश्वती नाही.

Edited By : Vijay dudhale

R

Dilip Mohite-Sharad Butte Patil
Sangola Politics : मला व्हिलन बनविण्याचा प्रयत्न; डॉ. अनिकेत देशमुखांच्या पोस्टमुळे शेकापमधील खदखद चव्हाट्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com