Dilip Mohite-Ashok Pawar Sarkarnama
पुणे

NCP Politic's : अशोक पवार, मोहितेंनी मनातील गोष्ट बोलून दाखवलीच : ‘आंबेगावला कायम मंत्रिपद; खेड, जुन्नर, शिरूरच्या आमदारांना वंचित ठेवलं’

Ashok Pawar-Dilip Mohite : दिलीप मोहिते यांच्या पराभवावर प्रश्न उपस्थित करत अशोक पवार यांनी खेड, जुन्नर आणि शिरूरला मंत्रिपदापासून दूर ठेवले गेल्याची खंत व्यक्त केली.

हरिदास कड

Chakan, 29 May : माजी आमदार दिलीप मोहिते हे 2024 मध्ये खेड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येतील, असे आम्हा सर्वांना वाटत होते. पण त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. परंतु निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळणार म्हणूनच खेडमध्ये मशिनचं सेटिंग झालं की काय, अशी शंका येते?, असे विधान शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले आहे.

दरम्यान, माजी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्यासोबत दिलीप माेहिते यांनी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. ‘आंबेगावला कायम मंत्रिपद मिळत गेले, त्यामुळे खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील आमदारांना मंत्रिपदापासून वंचित ठेवले गेले,’ अशी खंतही या दोघांनी खाजगी चर्चेत व्यक्त केली.

दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांना वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या. त्यात शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांचाही समावेश होता. या भेटीत मोहिते-पवार चर्चा रंगली. त्या चर्चेत दिलीप मोहिते यांची राजकीय वाटचाल, विधानसभेतील आठवणी जाग्या केल्या,

विधानसभेच्या २०२९ च्या आगामी निवडणुकीत खेड मतदारसंघातून दिलीप मोहिते आमदार होतील, असा आशावाद व्यक्त करून माजी आमदार पवार म्हणाले, दिलीप मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरीकांची झालेली गर्दी, कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी पाहता खेड तालुक्यातील जनतेचा मोहिते यांना अजूनही पाठिंबा असल्याचे दिसून येते. लोकांचा वाढता पाठिंबा हेच दर्शवतो आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. वाढदिवसाला येताना कार्यकर्ते नागरिक, पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ आणू नयेत, असे आवाहन केले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोहिते यांना निवासस्थानी येऊन शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते यांनी त्यांच्या मनातील खंत चर्चेवेळी बोलून दाखवली. आंबेगाव तालुक्याला नेहमी मंत्रिपद मिळत गेले, त्यामुळे खेड, शिरूर, जुन्नर या तालुक्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आम्हाला मंत्रिपदापासून कायम वंचित ठेवले गेले, त्यामुळे या तालुक्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही या दोघांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT