Dr. Amol Kolhe-Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Constituency : उमेदवारी मिळाली; पण बदललेले चिन्ह मतदारांपर्यंत पोचविताना कोल्हे-आढळरावांची दमछाक

Dr. Amol Kolhe- Shivajirao Adhalrao Patil News : शिरूरमधील युती व आघाडीचे (म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे) दोन्ही उमेदवार जुने असले, तरी त्यांची चिन्हे नवीन असल्याने या वेळी त्यांची कसोटी लागणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात नवे चिन्ह पोचविण्यासाठी त्यांची दमछाक होणार आहे.

Uttam Kute

Pimpri, 4 April : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, ती तेथील दोन मुख्य उमेदवारांच्या पक्षांनी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि त्यांच्या अध्यक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. परिणामी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी तेथील दोन्ही उमेदवारांचा या वेळी मोठा कस लागणार आहे.

शिरूरमधील युती व आघाडीचे (म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे) दोन्ही उमेदवार जुने असले, तरी त्यांची चिन्हे नवीन असल्याने या वेळी त्यांची कसोटी लागणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात नवे चिन्ह पोचविण्यासाठी त्यांची दमछाक होणार आहे. येथे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटातच थेट लढाई आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे विद्यमान खासदार उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे तेथे तीन वेळा खासदार राहिलेले रिंगणात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही उमेदवार हे त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचे फाइंड आहेत. म्हणजे त्यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांनी आढळरावांची, तर शरद पवारांनी कोल्हेंच्या उमेदवारीची घोषणा अगोदरच केल्याने ते प्रचाराला लागले. नंतर त्यांच्या पक्षाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. दोन्ही पवारांचा शिरूरच नाही, तर पुणे जिल्हा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे फुटीनंतरही आपलाच आहे, हे सिद्ध करण्याकरिता त्यांनी शिरूरची लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठीच अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेतील आढळरावांना आपल्या पक्षात आणून कोल्हेंच्या तोडीस तोड उमेदवार दिला. कारण, त्यांनी कोल्हेंना पराभूत करण्याचे चॅलेंज दिले आहे.

गतवेळीच नाही, तर त्याअगोदरही असे एकूण चार वेळा आढळराव हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढले आहेत. मात्र, या वेळी ते राष्ट्रवादीकडून मैदानात असल्याने त्यांचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. तीन टर्म खासदार राहिल्याने त्यांना मतदार ओळखत असला, तरी त्यांचे चिन्ह बदलल्याने या वेळी त्यांची चिन्हाबाबत थोडी अडचण झाली आहे.

ग्रामीण भागात नवे चिन्ह पोचविण्यासाठी व आता ते धनुष्यबाण नाही, तर घड्याळ आहे, हे त्यांना सांगावे लागत आहे. अशीच स्थिती कोल्हेंचीही आहे. मागील वेळी ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले होते. मात्र, पक्ष फुटल्यानंतर ते शरद पवार गटात गेले आहेत. त्यांना आता तुतारी हातात घेतलेला माणूस हे चिन्ह मिळाले असून, घड्याळ हे अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हेंनाही आता आपली निशाणी घड्याळ नाही, तर तुतारी आहे, हे पटवून द्यावे लागणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT