Sindhudurg, 4 April : खासदार संजय राऊत यांचं कुटुंब आणि मालक कोविडमधील भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात कधीही जेलमध्ये जाऊ शकतात. महाराष्ट्रात केजरीवाल भाग-2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पैशाने काही घेतलं नाही. भ्रष्टाचाराने त्यांचं आयुष्य बरबटलेलं आहे, असा हल्लाबोल आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मोदी आणि भाजपवर टीका केली होती. त्याला आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारचे 12 वाजवले, असा उल्लेख केला आहे. ज्यांनी स्वतःच्या मालकांचे तीन तेरा वाजवले आहे, त्यांनी असं बोलणं म्हणजे तो 2024 चा मोठा विनोद आहे. ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
व्यंकटेश उप्पर आजही गायब आहे. त्याला राऊत यांनी गायब केले, असा आरोप मी केला होता. माणसांना गायब करणं, महिलांना शिव्या देणे अशा चारित्र्याचा माणूस आमच्या नेत्यांवर टीका करत आहे. त्यांचे हात खुनांनी बरबटलेले आहेत. मागील 10 वर्षांत हे मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाहीत, असेही राणेंनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नाच्या असा करणाऱ्या संजय राऊत यांचा आमदार नीतेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्या बाजारू दलालांनी दुसऱ्यांना नाच्या बोलू नये. ज्याचं स्वतःचं अस्तित्व नाही, त्यांनी अशी हिंमत करू नये. त्याचं उत्तर 4 जूनला देऊ, कोणी कसा वचपा काढला ते समजेल. तुमच्यात दम असेल तर दक्षिण मुंबईची जागा लढवून दाखवा, असे आव्हानही राणेंनी राऊतांना दिले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गसाठी काय केले, याचा हिशेब हवा असेल तर खुल्या व्यासपीठावर या. किती विकासकामे अडविण्याचं काम विनायक राऊत यांनी केले आहे, हेही आम्ही सांगू. विनायक राऊत यांच्या प्रत्येक बैठकीत सात लोकही नसतात. गांधी आणि उद्धव ठाकरे कुटुंब दुसऱ्यांवर जगणारे कुटुंब आहेत. ते कोणाच्या पैशाने फिरतात? मोदींचे नाव घेण्याची यांची लायकी नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.
राणे म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवाराबाबत सगळा संभ्रम आज किंवा उद्या दूर होईल. सामंत व राणे कुटुंब यांचे राजकारणापलीकडे संबंध आहेत. नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात कौटुंबिक भेट झाली असेल. जसे राणे यांना आम्ही, तसे उदय आणि किरण सामंत आहेत. किरण सामंत हे सरळ मनाचे आहेत. त्यांनी कोणत्या भावनेत ते ट्विट केलं, हे आपण समजू शकत नाहीत. त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊन त्यांच्या सोबत आहोत. त्यांना कोणीही एकटं पाडू शकत नाही.
धमकी देणं हा वैभव नाईक यांचा धंदा आहे. त्यांनी राणेंचं नाव घेतलं नाही, तर मातोश्रीचा पगार मिळणार नाही. कुडाळमध्ये लोकसभेला मिळणारे लीड हे वैभव नाईक यांना उत्तर मिळेल. संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्या भावाची चिंता करण्यापेक्षा त्यांचा भाऊ नंदनवनमध्ये किती वेळ असतो, हे बघावं, असा सल्लाही नीतेश राणे यांनी राऊतांना दिला.
आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना आमदार नीतेश राणे म्हणाले, तुम्ही नसल्यामुळे आम्ही टेन्शन फ्री आहोत. तुमच्यासारखे खुनी, बलात्कारी गॅंग रेपचा आरोप असणाऱ्यांनी भाजपवर बोलू नये.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.