Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असतानाच काँग्रेसने मात्र कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला असल्याचा पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच काँग्रेसने स्पष्ट केले होते. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता बारामतीमधून काँग्रेसने उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून सहा जण इच्छुक असल्याचा समोर आले आहे. या सहा जणांच्या इच्छुकांची यादी काँग्रेसने (Congress) आता हायकमांडकडे पाठवली असल्याचे समोर आले आहे. रविणारी रात्री उशिरापर्यंत यातील एका उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार असून उद्या उमेदवारी अर्ज देखील भरला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आपल्याला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे सुरुवातीला लक्ष्मण हाके यांना काँग्रेस पाठिंबा दर्शवेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच काँग्रेसने सहा इच्छुकांची नावे फायनल केली आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. ठाकरे सेना बारामतीमधून उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ठाकरे सेना उमेदवार देणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
सहा इच्छुकांमध्ये रस्सीखेच
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून 6 उमेदवार इच्छुक असल्याचे समोर आले आहे. जिल्हा काँग्रेसने सहा इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेश काँग्रेस हायकमांडला पाठवली आहेत. यामध्ये आकाश मोरे, वैभव बुरगुले, रोहित बनकर, डॉ. अर्चना पाटील, विजय भिसे, तुषार ओहाळ यांचा समावेश आहे. यातील सहाही इच्छुक उमेदवार बारामती मधीलच असून बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेसने लढविल्यास या सहापैकी एक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.