Baramati By-Election 2026 : अखेर लक्ष्मण हाकेंनी निर्णय घेतलाच; बारामतीत पवारांना भिडणार, पण उमेदवारी कोणत्या पक्षाची? स्वत:च सांगितलं...

Laxman Hake Baramati election : काँग्रेसने बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत आपली ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस सोबतच या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची भूमिका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.
Laxman Hake, Sunetra Pawar
Laxman Hake, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Apr : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील नेत्यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

मात्र काँग्रेसकडून बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत आपली ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस सोबतच या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची भूमिका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी घेतली होती. मात्र या निवडणुकीत ते स्वतः उमेदवार म्हणून उतरणार की कोणत्या इतर कार्यकर्त्याला संधी देणार याबाबत संभ्रम होता त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी 17 अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा देखील समावेश आहे.

Laxman Hake, Sunetra Pawar
Congress Politics : राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांसाठी काँग्रेसचा गनिमी कावा, थेट दिल्लीतून वॉच!

काँग्रेस देखील उमेदवार देणार असून उमेदवारी फायनल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील उमेदवार देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी संपर्क करून आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरेंची सेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे.

या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडे झाल्यानंतर लगेचच लक्ष्मण हाके यांनी आपण या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे जाहीर केलं होतं. मात्र दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी एखादा आंदोलनकर्त्या कार्यकर्त्याला या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा सुतोवाच करत स्वतः ते ही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. तसेच या निवडणुकीमध्ये आपल्याला चार राष्ट्रीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यामध्ये काँग्रेस, आप आणि बसपा सारख्या राष्ट्रीय पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Laxman Hake, Sunetra Pawar
Ashok Kharat : दिवसाला 25 हजारांचे भाडे, मुंबईतील हॉटेलमध्ये 365 दिवस बुक असायची ती रुम.. खरातप्रकरणात धक्कादायक माहिती उघड

त्यामुळे लक्ष्मण हाके नेमकी कोणत्या पक्षाची उमेदवारी घेऊन मैदानात उतरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले उद्या मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून ओबीसी आंदोलक आहे. आणि आंदोलक म्हणूनच मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. माझ्या ओबीसी बांधवांचे अनेक प्रश्न अजंड्यावर आणण्यासाठी ही निवडणूक लढत आहे. सरकारने ओबीसी आरक्षणावर कशा पद्धतीने घाला घातला आहे आणि कशा पद्धतीने ओबीसींना डावलला जात आहे.

आणि बारामती मधील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. निवडणुकीमध्ये सहानुभूती आणि इतर मुद्दे असले तरी लोकशाही म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊन एक वेगळा पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. यातील कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यायचा आणि कोणत्या पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक अर्ज दाखल करायचा याबाबतचा अंतिम निर्णय उद्या अर्ज दाखल करताना घेणार असल्याचे देखील हाके यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com