Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा काँग्रेसच्या बड्या नेत्यासह जानकरांना फोन; बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती...

Baramati By Election 2026 : सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना फोन करून पाठिंबा मागितल्याने बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न वाढले असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati, 05 April : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध निवड व्हावी, यासाठी महायुतीसोबत शरद पवारांची राष्ट्रवादीही आग्रही आहे. स्वतः सुनेत्रा पवार यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी दोन दिवसांपूर्वी फोन केला होता. तसेच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनाही पाठिंब्यासाठी फोन केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची उद्या (ता. ०६ एप्रिल) शेवटची तारीख आहे, त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उद्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून महायुतीचे सर्व नेते बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.

महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची भूमिका पोटनिवडणूक लढवू नये, अशी असली तरी काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal ) यांनी तसे स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीत बारामती जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, त्यांनी उमेदवार न दिल्यास काँग्रेस बारामतीची जागा लढवेल, असे सपकाळ यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar
Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी हर्षवर्धन सपकळांच्या घोषणेतील हवाच काढली : बारामती पवारांचा बालेकिल्ला; काँग्रेस नगण्य...

काँग्रेस उमेदवार देण्याच्या भूमिकेचा वारंवार पुनरुच्चार करत असतानाच आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतरचही ही पोटनिवडणूक आहे, त्यामुळे आपण विचार करावा, अशी विनंती केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी पाच नावंही हायकमांडकडे पाठवली होती. तसेच, ते स्वतः बारामतीत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरायला येणार होते. पण आता सुनेत्रा पवार यांच्या फोननंतर प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar
Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी मानले शरद पवारांचे आभार; बारामती पोटनिवडणूक बिनविरोधच्या रणनीतीवरही भाष्य...

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनीही काँग्रेस नेत्यांना भेटून आपण बारामतीची पोटनिवडणुकीत काँग्रेससोबत राहणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जानकर यांनाही सुनेत्रा पवार यांनी फोन करून पाठिंब्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com