Ajit Pawar, Sharad pawar Sarkarnama
पुणे

Baramati Loksabha : 'माझे वय 62 च्या पुढे, मी किती दिवस थांबायचे', अजितदादा थेट बोलले

AJit Pawar News : साहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदे भूषवले. पुलोदचा प्रयोग असो, सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा असो असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या बदलत्या भूमिकेला आमचाही पाठिंबा होता, असे अजित पवार म्हणाले

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते महायुतीसोबत का गेले? हे मतदारांना पटवून सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टार्गेट करत आहेत. पवारसाहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. साहेबांची भूमिका बदलली की स्टॅट्रजी आणि आम्ही भूमिका घेतली की गद्दारी? वारे वा हे कसे चालले, अशा शब्दांत अजित पवारांनी बारामतीमधील Baramati सांगवी येथे झालेल्या सभेत महायुतीत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

साहेबांचे वय झाले आहे, असे म्हणत टीका करणाऱ्या अजित पवारांनी Ajit Pawar थेट आपल्या वयाचा आकडा सांगत आम्ही कधी संधी मिळणार अशी विचारणा केली, अजित पवार म्हणाले, 'पवारसाहेबांनाही Sharad Pawar सुरुवातीला कै. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदी नेते मंडळींबरोबर बारामतीकरांनी संधी दिली आणि तेही घडले. पवार साहेबांप्रमाणेच मीही महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रशासनात कर्तृत्व दाखवले आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहाेचलो. शेवटी माझेही वय ६२ च्या पुढे गेले आहे. मी किती दिवस थांबायचे, याचाही विचार झाला पाहिजे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदे भूषवले. पुलोदचा प्रयोग असो, सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा असो असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या बदलत्या भूमिकेला आमचाही पाठिंबा होता. मात्र आम्ही भूमिका घेतली तर गद्दार? हे कसे चालेल, असे अजित पवार म्हणाले.

सुनेत्रा पवारांना संधी द्या

बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना तीन वेळा संधी दिली. आता सुनेत्रा पवारांना संधी द्या. निश्चित विकासाची घाेडदौड मोदीसाहेबांच्या सहकार्याने अधिक गतीने पुढे घेऊन जाऊ, असे आश्वासन अजित पवार म्हणाले. मनमोहन सिंगाच्या काळात देशात 70 हजार कोटींची कर्जमाफी झाली हे विरोधक सातत्याने सांगतात, परंतु एकट्या महाराष्ट्रात भाजपचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी ३५ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी केली हे सांगताना विरोधक सोयीस्करपणे विसरतात, असे अजित पवार म्हणतात.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT