Supriya Sule, Chitra Wagh Sarkarnama
पुणे

Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई..! चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं; म्हणाल्या, 'तुतारी...'

सरकारनामा ब्यूरो

NCP Vs Bjp News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. तुतारी चिन्हावरून भाजपच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना एक्स हॅन्डलवर एक कविता ट्विट करत डिवचलं आहे. त्यातून त्यांची 'पिपाणी'च वाजवल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन ताईंमध्ये आता जुगलबंदी पाहावयास मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने गुरुवारी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट तुतारी चिन्हावर लढणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मूळ पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निर्णय दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला आठवड्यात शरद पवारांच्या पक्षाला चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार पक्षाला दिले. यावरून भाजपच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. एक्स हॅन्डलवर एक कविता ट्विट करत यांनी डिवचलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांना म्हणाल्या, ओ मोठ्ठ्या ताई… भाजपद्वेषाची जुनी पिपाणी वाजवून तुम्ही थकाल. कितीही खोट्याची पेरणी केली तरी ती जनतेच्या पचनी पडणार नाही. तुम्ही उंटावरील शहाणे उगाच नगारखाना बडवू नका. तुम्हाला पाणी पाजण्यासाठी आम्ही लवकरच युद्धाला तयार आहे, असे त्यांनी कवितेच्या माध्यमातून डिवचलं आहे.

चित्रा वाघ यांनी एक्सवर केले ट्विट...

ओ मोठ्ठ्या ताई….@Supriya_sule

तुतारीतुनी थकाल वाजवुनी

भाजपद्वेषाची जुनी पिपाणी…

करा कितीही खोटे पेरणी

परि जनतेच्या ना पडेल पचनी..

उंटावरली उगा अनेक शहाणी

पोकळ बडविती नगारखानी..

लवकरच तुम्हा पाजू पाणी

सज्ज आम्ही आहो युद्धरणीं…

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT