Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis News : निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे 'विशेष लक्ष' देणार; फडणवीसांची सक्त ताकीद

Pune Loksabha Election 2024 : माजी नगरसेवकांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले.

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांत पक्षाच्या उमेदवाराचा अधिकाधिक प्रचार कसा करता येईल यासाठी रणनीती आखली जात आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, पुणे शहर, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे 7 आणि 13 मे रोजी मतदान होत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान मंगळवारी 7 मे रोजी तर उर्वरित तीन लोकसभा मतदार संघाची निवडणूक 13 मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुणे शहरातील माजी नगरसेवक यांची एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या.

कोरेगाव पार्क येथील एका मंगल कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. पुणे महापालिका तसेच पुणे कॅन्टोन्मेंट भागातील नगरसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. भाजपाच्या शहरातील आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते. शहराध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष सचिव तसेच राज्य पातळी संघटनेचे पदाधिकारी देखील यावेळी हजर होते.

लोकसभा निवडणूक भाजपासाठी (BJP) अत्यंत महत्त्वाची असल्याने या निवडणुकीच्या काळात कोणतीही चूक करू नका. प्रकार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या भागात बरोबर जाऊ मतदारांची भेट घ्या. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती मतदारांना द्या. मतदानाच्या दिवशी अधिकधिक मतदार मतदान केंद्रांवर कसे येते यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना फडणवीस यांनी माजी नगरसेवकांना केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीत आतापर्यंत तुम्ही चांगले काम केले आहे यापुढे काळातही अतिशय प्रभावीपणे काम करत रहा त्याची दखल पक्षकडून घेतली जाईल. निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचारात टाळाटाळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

लोकसभा झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे याकडे लक्ष असू द्या, असेही त्यांनी सुनावले. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) येणाऱ्या खडकवासला तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसरमध्ये इतर पक्षांचे उमेदवार उभे आहेत, त्यांचेही काम जोमाने करा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT