Latur Lok Sabha : निलंगेकरांचे काँग्रेसच्या लातूरच्या दोन्ही युवराजांना चॅलेंज; ‘...तर तुमच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा देतो’

Arvind Patil Nilangekar Challenge to Deshmukh : काळे चष्मे घातलेल्या लातूरच्या दोन्ही युवराजांना मोदी यांनी केलेली कामे दिसत नाहीत. त्यांनी केलेली विकासकामे जाहीरपणे सांगावीत. त्यांच्याच व्यासपीठावर येवून मी आपल्या सरकारने केलेली विकासकामे सांगण्यास तयार आहे.
Arvind Patil Nilangekar
Arvind Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

Nilanga, 3 May : लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही युवराजांना माझे ओपन चॕलेंज आहे. आमच्या काळातील दहा वर्षांचा विकास आणि तुमच्या काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात आमच्या दहा वर्षांतील विकासाच्या पन्नास टक्के जरी विकास केला असेल, तर तुमच्या व्यासपीठावर येऊन तुम्हाला पाठिंबा देतो. जर पन्नास टक्क्यांच्या कमी विकास निघाला, तर तुम्ही आम्हाला पाठींबा द्या, असे ओपन चॕलेंज भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांना दिले.

महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. 3 मे) निलंगा येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अरविंद पाटील निलंगेकर (Arvind Patil Nilangekar) यांनी देशमुख यांना आव्हान दिले. निलंगेकरांनी चॅलेंज देताच उपस्थितांमधून टाळ्या अन् घोषणाने सभास्थळ दणाणले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Patil Nilangekar
Dispute In Mahayuti : खासदार लोखंडे कोण? आमदार काळेंच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नावरून गोंधळ

अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, देव, देश, धर्म ही पंतप्रधान मोदींच्या त्रिसूत्रीचा संगम साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मागील दहा वर्षांत विकास कामांना गती दिली आहे. अध्यात्मिकतेला सांस्कृतिक जोड देवून त्यांनी विकसित भारताची संकल्पना मांडली आहे. या अनुषंगाने गेल्या दहा वर्षांत देशात व लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.

काळे चष्मे घातलेल्या लातूरच्या (Latur) दोन्ही युवराजांना मोदी यांनी केलेली कामे दिसत नाहीत. त्यांनी केलेली विकासकामे जाहीरपणे सांगावीत. त्यांच्याच व्यासपीठावर येवून मी आपल्या सरकारने केलेली विकासकामे सांगण्यास तयार आहे. युवराजांच्या पालकमंत्रिपदाच्या काळात रस्त्यावर एक टोपले खडी व डांबरही पडलेले नाही. हीच मंडळी आज विकास झालाच नाही, असे आरोप करत आहेत. विकास कामांची चर्चा करण्यासाठी मी कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहे, असे खुले आव्हान अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिले.

Arvind Patil Nilangekar
Thane Loksabha News : खरी शिवसेना आपलीच; त्यांच्याकडे विरघळून जाणारे 'आईस्क्रिम' : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

लातूर जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाल्या असून एक सक्षम नेतृत्व या देशाला मिळाल्याने आपण भाग्यशाली आहोत. येत्या सात तारखेला महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना निलंगा मतदार संघातून पंचाहत्तर हजार नव्हे तर एक लाखाचे मताधिक्य देणार आहे, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Arvind Patil Nilangekar
Solapur Lok Sabha 2024 : राम सातपुतेंवर मिम्स बनवणे आले अंगलट; काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com