ED Action Action In Pune : Sarkarnama
पुणे

ED Action Action In Pune : पुण्यातल्या उद्योगपतीवर ED ची कारवाई; नऊ कोटींची संपत्ती...

Chetan Zadpe

ED Action Action In Pune : मागील काही काळापासून अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) कारवाईचा धडाका वाढला आहे. राजकीय नेत्यांसह अनेक उद्योगपतींवर कारवाईचा बडगा उचलला आहे. आता पुण्यातील एका मोठ्या उद्योगपतींवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील आईस्क्रीम कंपनीचे संचालक अय्यास्वामी रामसुब्रहमण्यम आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांची ९.७७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस ईडीने पाठवलेली आहे. (Latest Marathi News)

ईडीची ही नोटीस प्राप्त होताच रामसुब्रहमण्यम यांनी थेट उच्च न्यायालयाचा धावा केला आहे. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीत १० दिवसांत संपत्ती जप्त करण्यात येईल, असा उल्लेख केला आहे. या नोटिशीला आव्हान देत रामसुब्रमण्यम यांना ४५ दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी याचना केली आहे. यानंतर आता त्यांना उच्च न्यायालयाने १५ दिवसांचा दिलासा दिला आहे.

38.68 कोटींची फसवणूक ?

आइस्ड डेसर्ट अँड फूड पार्लर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (IDFPL ) या कंपनीचे रामसुब्रमण्यम हे संचालक आहेत. यामध्ये 38.68 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणी ईडीने गुन्हाही दाखल केला आहे. ED ने पीएमएलए या कायद्यानुसार 16 मे रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे. पुण्यात IDFPL मध्ये 38.68 कोटी रुपयांच्या अफरातफरीबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीकडून केला जात होता. त्यानुसार ईडीने कारवाईचे पावलं उचलली आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली.

न्यायालयाकडून दिलासा -

ईडीची नोटीस मिळताच रामसुब्रहमण्यम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. ए. सानप आणि न्यायमूर्ती मंजुशा अजय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. रामसुब्रहमण्यम यांच्याकडून वकील स्वप्नील अंबुरे यांनी बाजू मांडली. रामसुब्रहमण्यम यांना किडनीचा विकार आहे, असे सांगण्यात आले.

ईडीकडून आठ नोव्हेंबरला नोटीस पाठवून पुढील दहा दिवसांमध्ये संपत्ती जप्त करणार असल्याचे निर्देश दिले होते. खरंतर नियमानुसार आम्हाला यासाठी 45 दिवसांचा कालावधी मिळायला हवा होता. त्यामुळे दिल्लीमध्ये ईडी कार्यालयात दाद मागता आली असती का? यामुळे अंबुरे यांनी आणखी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. अंबुरे यांच्या मागणीला ईडीच्या वतीने हितेन वेनगावकर यांनी विरोध दर्शवला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने कारवाईस १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT