Maharashtra Cabinet Expansion : Sarkarnama
पुणे

Cabinet Expansion : पंढरीच्या विठुरायानंतर आता शिंदेंच्या आमदारांचं प्रभू श्रीरामाला साकडं; म्हणाले," हे राम..."

Mahayuti Government News : मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी आतापर्यंत...

Chaitanya Machale

Pune News : शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. इतर बंडखोरांना मंत्रीपदावर संधी मिळाली. मात्र बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे यांना साथ देणारे भरत गोगावले यांच्या गळ्यात मात्र अद्यापही मंत्रीपदाची माळ पडलेली नाही. त्यामुळे गोगावले हे चांगलेच नाराज असून मंत्रीपदासाठी आपल्याला संधी कधी मिळणार याची वाट ते पाहत आहेत.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे पहिले शिल्प हांडेवाडी भागात उभारण्यात येणार आहे. हे देशातील पहिले शिल्प असल्याचा दावा केला जात आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून हे शिल्प उभारले जाणार असून याचा पायाभरणी समारंभा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आणि महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

शिवसेनेच्या बंडामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडणाऱ्या ४० आमदारांमध्ये आमदार गोगावले हे अग्रेसर होते. त्यामुळे शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असेल हे निश्चित होते. मात्र पहिल्या यादीत त्यांचे नाव आलेच नाही. त्यानंतर प्रत्येक पंधरा ते वीस दिवसांनंतर होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेत गोगावले यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती.

राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार हे पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये जुलै २०२३ ला सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची तर इतरांकडे महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्रिमंडळाच्या या विस्तारात मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या आमदार गोगावले यांना संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा असताही या विस्तारामध्ये गोगावले यांच्या पदरी दरवेळीप्रमाणे निराशाच पडली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी आतापर्यंत गोगावले यांनी देवांना साकडे घातलेले यापूर्वी पहायला मिळाले आहे. (Cabinet Expansion)

पुण्यात हांडेवाडी भागात कार्यक्रमासाठी आलेले असताना मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी गोगावले यांनी श्रीरामाकडे प्रार्थना केली. ते म्हणाले , मंत्रिमंडळात असताना अद्याप मी मंत्री झालेलो नाही. आता प्रभू श्रीरामाच्या शिल्पाची पायाभरणी माझ्या हस्ते झाली आहे. त्यामुळे आता मी मंत्री होईल, अशी आशा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT