Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis Ajit Pawar : फडणवीसांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विषय काढताच अजित पवारांनी उभे राहत जोडले हात

Political News : पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगली टीम आम्हाला मिळाली असल्याचे सांगितले.

Sudesh Mitkar

Pune News : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूर येथील महिला आयपीएस अधिकारी यांच्यासोबत झालेलं फोनवरील संभाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यानंतर अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. त्यानंतर बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगली टीम आम्हाला मिळाली असल्याचे सांगितले. त्यानंतर याच गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्यानंतर अजित पवार यांनी थेट उभे राहून देवेंद्र फडणवीस समोर हात जोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या 44 योजना अशा आहेत. ज्या सेवा, योजनांनासाठी 90 टक्के नागरिक अप्लाय करत असतात. त्यामुळे या 44 योजनांच्या सोयी सुविधा जर योग्य प्रकारे दिल्या तर 90 टक्के लोक राज्य सरकरचा जयजयकार करतील. त्यामुळे आता राज्य सरकारने या 44 सेवा आणि योजनांवर लक्ष केंद्रित केले असून पुढील तीन महिन्यांमध्ये सगळ्या सेवा डिजिटल लोकांना उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीने या सेवा योजनांसाठी अप्लाय केल्यानंतर. ती फाईल कुणाकडे आहे याबाबतची माहिती तात्काळ अप्लाय करणाऱ्याला मिळेल. त्यामुळे कोणीही उगाचच फाईल अडवू शकणार नाही, तसे केल्यास त्याबाबतची सूचना डिजिटल स्वरूपात त्याच्या वरिष्ठापर्यंत पोहोचेल. त्यामुळे पारदर्शी आणि वेळेमध्ये लोकांना या सुविधा मिळू शकतील, असे फडणवीस म्हणाले.

या 44 सेवा आपण पुढील काही महिन्यात येत असून त्यानंतरच्या दोनशे सेवा या 26 जानेवारीपर्यंत देणार आहे. तसेच संपूर्ण अकराशे सेवा मे महिन्यापर्यंत संपूर्ण डिजिटल पद्धतीने देण्यात येणार आहेत. या सेवा डिजिटल झाल्यास तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामासाठी नागरिकांची होणारी गर्दी कमी होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

या ज्या काही अकराशे सेवा डिजिटल पद्धतीने देण्यात येणार आहेत. त्यातील 50 टक्के हिस्सा या महसूल विभागाशी निगडित आहे. त्यामुळे महसूल विभाग जर सेवा देण्यात सुधारला तर राज्य सुधारणार आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी सांगितलं की कशा पद्धतीने सर्व चांगले अधिकारी एकत्रित आले आहेत. त्याबाबत अजित पवार यांनी माझे धन्यवाद मानले पाहिजेत कारण उत्तम अधिकारी हे मुख्यमंत्रीच प्लेस करत असतात, असे फडणवीस म्हणाले. यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट उभे राहून देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे हात जोडले यामुळे एकच हशा पिकला.

त्यानंतर फडणवीस म्हणाले, 'यापुढेही जेवढे उत्तम अधिकारी तुम्ही मागाल तेवढा आम्ही उत्तम अधिकारी देऊ. त्या प्रत्येक वेळी तुम्ही मला अशाच पद्धतीने धन्यवाद द्या,' अशी माझी विनंती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT