Gaja Marne Meet Parth Pawar  Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला; कारण काय?

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार बारामती, शिरूर आणि मावळ मतदार संघामध्ये राजकीयदृष्ट्या चांगलेच ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पार्थ पवार यांनी मागील काही दिवसांमध्ये शिरूर लोकसभा मतदार संघातील हडपसर भागात पदाधिकारी - कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या. भेटीगाठी वाढल्याने पुन्हा एकदा पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज होत आहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024)

याच दरम्यान पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी सपत्नीक भेट घेतली आहे. ही भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळांबरोबरच पोलिस दलात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गजा मारणे याच्यावर खून, खंडणी अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच यापूर्वी अनेकदा त्यांच्यावर मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे. शहरातील प्रमुख सराईत गुंडांमध्ये त्यांचे नाव पहिल्या रांगेत घेतले जाते. (Latest Marathi News)

दरम्यान गेल्या महिन्याभरात शहरात टोळीयुद्ध आणि गुंडांचे राजकीय लागेबांधे याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता गुंड गजा मारणे याने अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतल्यामुळे, गजा मारणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाटेवर आहेत का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यापूर्वी शरद मोहळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा देखील चर्चेचा विषय बनला होता. आता गजा मारणे आणि त्याची पत्नी जयश्री मारणे यांनी पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र गजा मारणेने पार्थ पवार यांची भेट कशासाठी होती? याबाबत अधिक स्पष्टता समोर आली नाही. (Latest Political News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT