Pune, 23 December : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित झाले. त्याचवेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या तीन दिवस अगोदर मला बोलावून घेतले होते. आपल्याला दहाच मंत्रिपदं मिळाली आहेत. राज्यातील सर्व विभागाचा समतोल साधताना मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे सांगितले हेाते. त्याचवेळी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असा शब्द दिला होता, असे सांगून मावळचे आमदार सुनील शेळकेंनी मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्यामागची इनसाईड स्टोरी कथन केली.
आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, महायुतीमध्ये संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन नंबरवर आहे. आम्हाला मंत्रिपदाच्या दहाच जागा मिळाल्या. मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या तीन दिवस अगोदर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मला बोलावून घेतले होते.
आपल्याला मंत्रिपदाच्या (Minister Post) अकरा किंवा बारा जागा मिळतील, असं अपेक्षित होतं. पण, आपल्याला केवळ दहाच जागा मिळाल्या आहेत. मंत्रिमंडळात वरिष्ठ आणि तरुण नेतृत्वाला संधी देताना राज्यातील सर्व विभागाचा समतोल ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे जो काही निर्णय होईल, तो आपल्याला मान्य करावा लागेल, असं मला त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मी एका क्षणात कोणताही विचार न करता पक्षश्रेष्ठी म्हणून तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि दत्तात्रेय भरणे ही दोन कॅबिनेट मंत्रिपदं आहेत. तिसरं मंत्रिपद द्यायचं, तर आमच्याकडे तेवढी मंत्रिपदे किंवा आमदारही तेवढे निवडून आलेले नाहीत. आमच्याकडे पूर्वी १४ ते १५ मंत्रिपदं होती, त्यावेळी पुण्याला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. पण आमच्याकडे आता दहाच मंत्रिपदं आलेली आहेत. त्यात पुण्याला दोन मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत.
इतर जिल्ह्यांचा विचार करता पुणे आणि नाशिक जिल्ह्यालाच दोन मंत्रिपदं मिळालेली आहेत. पुण्यात दोन मंत्रिपदं असताना तिसरं मागणं उचित वाटलं नव्हतं. आगामी काळात कुठं ना कुठं आम्हाला संधी दिली जाईल, असे वाटतंय. पण मंत्रिपदाबाबत जो काही निर्णय झाला आहे, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मोठा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत, असेही शेळकेंनी सांगितले.
शेळके म्हणाले, ‘मावळ पॅटर्न’ला सडेतोड टक्कर देत तब्बल एक लाखापेक्षा अधिक मताधिक्क्यांनी मी निवडून आलेलो आहे. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज वैगेरे काही नाही. कारण, मी पक्षसंघटनेतून पुढे आलेलो आहे. त्यामुळे मी नाराजीच्या भावनेतून राजकारणात कधीही काम करणार नाही. मंत्रिपदापेक्षा माझ्या मावळ तालुक्यातील जनतेची कामे महत्वाची आहेत.
माझ्या प्रचारसभांमधून अथवा जाहीरपणे अजितदादांनी माझ्या मंत्रिपदबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता. अजित पवारांनी शब्द दिला होता की सुनीलल आमदार करा; मी मावळला पाच हजार कोटी रुपयांचा निधी देईल. मी त्यातच समाधानी आहोत, असेही आमदार सुनील शेळकेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.