पिंपरी : 10 मार्च | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आमदार सुनील शेळके ( Sunil Shelake ) दमदाटी करीत आहेत, असा आरोप अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केला होता. या आरोपांवरून सध्या मावळ तालुक्यात रणकंदन सुरू आहे. शरद पवारांचे सहकारी आणि माजी मंत्री मदन बाफना यांनी शनिवारी ( 9 मार्च ) पत्रकार परिषद घेऊन शेळकेंवर पुन्हा हल्लाबोल केला. याला सुनील शेळकेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवार मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काही लोकांची रणनिती सुरू आहे," असा खळबळजनक दावा सुनील शेळकेंनी केला आहे.
"अजित पवार ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांना ट्रोल करण्याकरिता काहींनी करोडो रुपये खर्चून शेकडो माणसे कामाला लावली आहेत. तसेच, माझं काय चुकलं? हे सांगावं म्हणून शरद पवारांना भेटणार आहे," असं शेळकेंनी सांगितलं. शरद पवारांना भेटून दाखवावं, हे मदन बाफनांनी दिलेलं आव्हान एकप्रकारे शेळकेंनी स्वीकारलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"शरद पवार ( Sharad Pawar ) राज्याचे नाही, तर देशाचेही नेते आहेत. त्यांनी माझी अनेक कामे केली आहे. त्यामुळे पवारांना भेटणं हा माझा हक्कच नाही, तर अधिकार आहे. शरद पवारांच्या मेळाव्याला जाऊ नये म्हणून एकालाही फोन करून अथवा भेटून धमकावलं नाही. तरी शरद पवार तसं काय बोलले हा प्रश्न माझ्यापुढं आहे. कारण, संपूर्ण 55 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधी कुणावर अशी टीका केली नाही. मग माझ्या बाबतीत एवढी टोकाची भूमिका का घेतली, हे जाणून घेण्यासाठी भेटणार आहे," असं शेळकेंनी स्पष्ट केलं.
'शरद पवार खोटे बोलत असतील, तर शेळकेंनी राज्यभर फिरावे,' असं आव्हान मदन बाफनांसह खासदार सुप्रिया सुळेंनी दिलं होतं. त्यावर सुनील शेळके म्हणाले, "मला खासदार आणि माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं नाही. तुमचं रक्ताचं नातं एकत्रित राहिल्यास आनंदच आहे. मावळच्या जनतेनं माझ्यावर मोठं प्रेम करीत विश्वास ठेवला आहे. पण, शरद पवारांच्या आरोपानं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत."
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.