Pune News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याच्या स्पर्धेला सुरुवात पाहायला मिळत आहे. या श्रेय वादाला आता आणखी धार देत भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचला.
पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये आमदार महेश लांडगे बोलत होते ते म्हणाले,"मी पैलवान आहे, कोणालाही घाबरत नाही. समोरच्याला अंगावर घेण्याची सवय आहे," असे म्हणत अप्रत्यक्षपणे महेश लांडगे यांनी अजित पवारांनाच आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये झालेला विकास भाजपच्या नेतृत्वाखाली झाला असून, त्याचे श्रेय अजित पवार (ajit Pawar ) यांच्या पक्षाकडून घेतले जात असल्याची टीका अप्रत्यक्षपणे महेश लांडगे यांनी केली.
दिव्यांग भवन प्रकल्पाचे उदाहरण देत, लांडगे म्हणाले की, "2017 मध्ये भाजपला (BJP) पालिकेची सत्ता मिळाल्यानंतर अनेक विकासकामे मार्गी लागली. दिव्यांग भवनसुद्धा त्याचाच एक भाग आहे. या विकासामध्ये आमचेही योगदान मोठे आहे. इतरांचे योगदान नाकारत नाही, पण आमचे योगदानही दुर्लक्षित होता कामा नये."
शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे सत्ता दिली नसती तर काय केले असते? देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का? असा सवाल महेश लांडगे यांनी उपस्थित केला. गेली 30 वर्षे काय केले असे ते येऊन सांगतायत, ते आम्ही नाकारत नाही. मात्र, आम्ही पण 2017 पासून विकास केलेला आहेच ना? हे कसे काय नाकारता, असा सवाल महेश लांडगे यांनी विरोधकांना केला.
शहराच्या विकासासाठी भाजपने पारदर्शक कारभार केला असून, विरोधकांच्या टीका केवळ श्रेय घेण्यासाठी असल्याचे लांडगे म्हणाले. 'आम्ही काम केले तर तो भ्रष्टाचार, आणि इतरांनी केले तर तो विकास असे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यासोबतच त्यांनी संतसृष्टी, आयुक्तालय या मुद्द्यावरही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामे करून दिली, पण श्रेय मात्र दुसऱ्यांचे घेत आहेत. आता माझेही नाव कुठेतरी यायला हवे," अशी भावना व्यक्त करत लांडगे यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संतसृष्टीचे भूमीपूजन 25 मे 2013 रोजी झाले. याची पहिली निविदा निघाली 12 डिसेंबर 2024 ला निघाली तर दुसरा टप्पा सुद्धा 7 मार्च 2024 ला सुरु झाला. संतसृष्टीची कल्पना तुमची आहे, हे मी मान्य करतो. मात्र, हे सर्व करीत असताना तुम्ही लोकांना फसवले. ज्यावेळेस एकाद्या प्रकल्पाचे उदघाटन करतो त्यावेळी भूमिपूजन व सर्व कामाच्या टप्प्याच्या तारखा समोर येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगत हा संतसृष्टीचा प्रकल्प 12 वर्षांपासून रखडण्याचे कारण वेगळेच सांगितले, ते मला पटत नाही. मधल्या काळात अडीच वर्ष तुमचे सरकार होते. त्यावेळी हे काम करण्याचे सुचले नाही का ? असे म्हणत आमदार लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
संतपिठाचे आपण उदघाटन केले पण ते उभारत असताना भरपूर अडचणी आल्या. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत केली. 15ऑगस्ट 2018 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी पोलीस आयुक्तलयाचे आपण भूमिपूजन केले आणि आज आपल्याच हातून उदघाटन होत आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच चुकीचे काम केले नसल्याचे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.