Neelam Gorhe Sarkarnama
पुणे

Maratha Reservation : 'जीआर'बाबत नीलम गोऱ्हेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती ; म्हणाल्या, 'विशेष अधिवेशन...'

Neelam Gorhe press conference in Pune : पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य.

Sudesh Mitkar

Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केल्यानंतर सरकारने आरक्षणासंदर्भात एक 'जीआर' काढला आहे. त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेणे आवश्यक आहे. हे अधिवेशन कधी होणार याबाबत आता महत्त्वपूर्ण माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. (Neelam Gorhe Statement on Maratha Reservation GR)

पुण्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरती भाष्य केले. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन विभागाची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत मेट्रोच्या कामामुळे ट्राफिक जाम होत असल्याचे पोलीस प्रशासनाने निदर्शनास आणून दिले. त्याबाबत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित केले पाहिजे.

मेट्रो मार्शल वाहतूक मदतीसाठी नेमणार होते, पण ते पुरेसे नेमले नाहीत. मुख्यमंत्र्यांना मेट्रोबाबत निवेदन देऊन मेट्रोने ते पुरेसे नेमले पाहिजेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणल्या, 'डीपीडीसी'मधील निधी महायुतीच्या ठरलेल्या नियमानुसार मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि आढळराव पाटील यांना त्यांचा निधी मिळेल. बारामती, भोर - वेल्हा - मुळशीसह इतर शिवसैनिक आहेत, त्यांना निधी देण्यात येईल. शिवसैनिकांनाही चांगला निधी मिळेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात येणार आहे.

तसेच शहरातील शंभर मंदिरात कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, मराठा आरक्षण हा विषय मुख्यमंत्र्यांनी सोडवला आहे. त्यामुळे त्यांचा सर्वांना अभिमान वाटतो. मराठा नेते जरांगे व मुख्यमंत्र्यांनी आरक्षण आंदोलनाचा विषय हाताळला, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ, असे त्यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणाबाबत एक दिवसीय अधिवेशनही घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, येत्या 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षणावर अधिवेशन घेतले जाणार आहे.अधिकृत तारीख कळली नसली तरी यात सर्व वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आरक्षणबाबत मतभेद असले तरी त्यांनी चिंता व्यक्त करणे स्वाभाविक आहे. पण त्यांना मुख्यमंत्र्यांबाबत आदर नाही, त्यांना मंत्रिमंडळात राहायचे नाही, असे नाही.

आंबेडकरांनी शिंदे गटात यावं...

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गटाने 'इंडिया' आघाडीत यावं, असं आवाहन केलं होतं. त्याला उत्तर देताना गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकर यांनीच शिंदे गटात येण्याचं अवाहन केलं. लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, भाजपचे '40 प्लस' खासदार निवडून येणार ते आमचे असणार आहेत. आमच्या शिवाय ते पूर्णच होऊ शकणार नाहीत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT