Parliament Attack : संसदेतील गोंधळानंतर विधानपरिषदेसाठीचे पास बंद ; सभापती नीलम गोऱ्हे यांची घोषणा

Assembly session : संसदेचे कामकाज सुरु असताना दोन अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक सभागृहात उड्या मारल्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला.
Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhe Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच बुधवारी संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. संसदेचे कामकाज सुरु असताना दोन अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक सभागृहात उड्या मारल्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. एवढंच नाही तर या अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उड्या मारताना स्मोक कॅण्डल पेटवल्या होत्या. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात सुरक्षा व्यवस्थेला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्या नुसार विधानपरिषदेसाठीचे पास बंद करण्यात आल्याची घोषणा सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली तर दुसरीकडे विधानसभेत एका आमदारांच्या नावे दोन जणांनाच पास देण्यात येणार आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरातील विधान भवनाच्या गॅलरीसाठी देण्यात येणाऱ्या पासेसचं काम तातडीनं थांबविण्यात आलय.

Dr. Neelam Gorhe
Parliament Winter Session 2023: "त्या घटनेनंतर देखील संसद चालली ;आता ही चालणार"...

दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच बुधवारी दोन जणांनी संसदेत प्रवेश केल्याचा पारकर घडला. संसदेचे कामकाज सुरु असताना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अघटित घडले. लोकसभेचे (Lok Sabha) सुरक्षाकवच भेदत तिघांनी थेट सभागृहात उडी घेतल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. या दोन तरुणांनी उड्या घेतल्याने धूरही पसरला. त्यामुळे खासदारांमध्ये खळबळ उडाली. नेमके काय घडले, हे कुणालाच कळत नव्हते. या प्रकारानंतर संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकाराची माहिती समजताच तात्काळ या वर नागपूर हिवाळी अधिवेशनात सुरक्षा व्यवस्थेला सतर्कतेचा आदेश देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्या नुसार येत्या काळात आता विधानपरिषदेसाठीचे पास बंद करण्यात आल्याची घोषणा सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली तर दुसरीकडे विधानसभेत एका आमदारांच्या नावे दोन जणांनाच पास देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या संसदेतील प्रकारानंतर काही काळ नागपुरातील हिवाळी अधिवेशनात तणावपूर्ण वातावरण होते.

दरम्यान, संसदेतील या घटनेवर विधानसभेत चर्चा झाली. यामध्ये सभागृहात चोख सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar ) यांनी दिली.

(Edited by Sachin Waghmare)

Dr. Neelam Gorhe
Winter Session Parliament : भारतीय जमिनीवर चीनी सैन्याची घुसखोरी; राजनाथ सिंह म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com