Walchandnagar News : निवडणुका जवळ आल्या की गावागावांत जायचे, गोड बोलायचे आणि पै-पाहुण्यांचे राजकारण करायचे. जातीवादीचे विष पेरायचे, ही आमच्या विरोधकांची जुनी सवयच आहे. विरोधक आगामी काळात खोटी आश्वासने देतील; पण तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडून नका, असे आवाहन जनतेला करतानाच आमदार दत्तात्रेय भरणे यांनी नाव न घेता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. (MLA Dattatray Bharane criticizes former minister Harshvardhan Patil )
इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आमदार दत्तात्रेय भरणे बोलत होते. थोरातवाडी परिसरासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भरणे यांचा सत्कार करण्यात आला. (Indapur Politics)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, इंदापूर तालुक्यातील जनतेने विराेधकांना सलग २० वर्षे निवडून दिले होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या काळात त्यांनी तुमच्या गावासााठी काय केले? हे तालुक्यातील मतदारांनी जरा तपासून बघावे. तुमच्या गावाचा त्यांच्या काळात काय विकास झाला, याची माहिती घ्यावी.
निवडणुका आल्या की ते फक्त गोडगोड बोलतात. गावोगावी जाऊन फक्त पै-पाहुण्यांचे राजकारण करायचे आणि तालुक्यात जातीवादाचे विष पेरण्याचे काम आमचे विरोधक आजपर्यंत करत आले आहेत. ही त्यांची जुनीच सवय आहे. आगामी निवडणुकीच्या काळातही ते तुमच्याकडे येतील, तुम्हाला गोड गोड बोलतील. आम्ही हे करू, आम्ही ते करू अशी खोटी आश्वासने देतील. पण, तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांना पुन्हा थारा देऊ नका. याउलट ते तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा 20 वर्षांत तुम्ही काय केले, अशी टीका भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. लासुर्णे-उद्धट रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. याशिवाय थोरातवाडी परिसरातील रस्त्यांची कामे झाल्याने दळणवळण सोयीस्कर झाले आहे. आगामी काळातही तालुक्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द माजी मंत्री भरणे यांनी जनतेला दिला.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, माजी संचालक कांतीलाल जामदार, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, केशव नगरे, सरपंच साधना निकम, उपसरपंच दिंगबर घोडके उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.