Sudhir Mungantiwar Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला; म्हणाले "शिवसेना दोन भावांची..."

Sudhir Mungantiwar : बारामतीच्या दौऱ्यानंतर पुण्यात साधला पत्रकारांशी संवाद

सरकारनामा ब्युरोे

BJP News : राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या कसब्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांनी आज बारामती दौरा केला. बारामतीनंतर त्यांनी पुण्यात येत कसब्यातील वातावरणाबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेबाबत असं काही वक्तव्य केलंय की त्यामुळं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कसबा आणि चिंचवडमधून मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवू, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "उद्या माझ्या हस्ते प्रचाराला नारळ फोडला जाणार आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजयी होऊ." तसेच यावेळी त्यांनी कसबा मतदारसंघात कुणीही नाराज नसल्याचं सांगितलं. धीरज घाटे, गणेश बिडकर यांच्याशी बोललो आहे. सर्व इच्छुक उमेदवार आता कामाला लागले असल्याचे त्यांनी सांगितलं.

यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितलं की, "कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर काम करणं जरुरी असतं. आज बारामतीत (Baramati) तेच पहायला मिळालं. तसेच तेथील कार्यकर्त्यांनीही तेथील कामाबाबत माहिती दिली. बारामतीत जे चांगल आहे त्याचं अनुकरण केलंच पाहिजे", असं मत मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

विधानपरिषदेचं विश्लेषण सुरूय

यानंतर विधानपरिषदेतील (MLC Election) पराभव नियोजनात त्रुटी राहिल्याचा अंदाज व्यक्त केला. मुनगंटीवार म्हणाले, "विधानपरिषदमध्ये पराभव झाला, त्याचं विश्लेषण करत आहे. कुठं चुकलं त्याचं विश्लेषण करू. नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता आहे."

मामा-भाच्यांचं स्वागत करू

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) काँग्रेसवर नाराज आहेत. तसेच काँग्रसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राजिनामा दिला आहे. ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील, या चर्चेवर मुनगंटीवार यांनी थेटच उत्तर दिलं. ते म्हणाले, "मला वाटतं नाही की बाळासाहेब थोरात भाजपचा झेंडा हाती घेतील. पण आम्ही त्या मामा-भाच्यांचं स्वागतच करू", असं म्हणत थोरात-तांबे यांच्यासाठी भाजपमध्ये पायघड्या टाकल्याचं सूचित केलं.

महाविकास आघाडी मायावी

मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीचा मायावी असा उल्लेख केला आहे. यावेळी ते म्हणाले, की भाजपने या महाविकास आघाडीचा मायावी रूप समजून घेतलं पाहिजे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीवेळी त्यांनी बिनविरोध निवडणूक करण्याचं भावनिक वातावरण तयार केलं.

आताही कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी मी आग्रही आहे. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. त्यामुळं या मायावी नेत्यांना बळी कधीच पडू नये. अंधेरीत आम्ही भावनेला महत्त्वं दिलं. तेथे लढलो असतो तर जिंकलो असतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना तर दोन भावांची...

यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निवडणूक निर्णय आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी केली. याचा मुनगंटीवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "आपल्या देशात न्यायव्यवस्था आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन बाजू आहेत. खटला चालविताना तर्कवितर्क होतात. मात्र तुम्हीच योग्य काय अन् अयोग्य काय तुम्ही ठरवाल का?"

यानंतर मुनगंटीवर यांनी, 'शिवसेना ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या एकट्याचीच नाही त्यांच्या दोन भावाची पण आहे', असं वक्तव्य केलं. यामुळं आता राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून चर्चांना उधाण आलं आहे.

...हा तर 'पोलिटिकल अल्झायमर'

मुनगंटीवार यांनी यावेळी अदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "यापूर्वी माझी सुरक्षा जेव्हा काढली होती. आता हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षा मागत आहेत. हा म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे. या प्रकाराला तर 'पॉलिटिकल अल्झायमर' म्हणायला हवं. सुरक्षा देण्यासाठी एक समिती असते, ती मूल्यांकन करून ठरवते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT