Pune News : पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये नामदेवराव जाधव हे एका कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. परंतु, या कार्यक्रमाला कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत भांडारकर इन्स्टिट्यूटकडून परवानगी नाकारली गेली होती. त्यानंतर नामदेवराव जाधव हे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी नवी पेठेतील पत्रकार भवनात गेले होते. याचदरम्यान, जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर आता नामदेवराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांनी काळं फासल्याच्या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नामदेवराव जाधव म्हणाले, मराठा आरक्षणासंबंधीची भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राग अनावर झाला. आणि तसेच माझा पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रमही उधळून लावला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. हा हल्ला शाहू, फुले, आंबेडकरांचा नाव घेणाऱ्या गुंडांनी करवून आणला. या विचारांचा त्यांनी खून केला असल्याची टीका त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच छत्रपतींचे विचार जगभरात जाऊ नयेत म्हणून हा हल्ला केला आहे. हा हल्ला लोकशाही, पोलिसांवरचा हल्ला आहे. कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज करणारा हा हल्ला आहे. त्यामुळे संबंधितांवर आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार असल्याचे कागदपत्रे हाती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वास्तव स्वीकारलेलं नाही. या हल्ल्यामागे शरद पवार आणि रोहित पवार आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी, आमदारकी रद्द करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे.
हा गुंडागर्दीचा कार्यक्रम मी महाराष्ट्रात चालू देणार नाही. मीदेखील औरंगजेबाला या मातीत गाडणाऱ्या छत्रपती शिवरायांचा, राजमाता जिजाऊंचा वंशज आहे. मराठा आरक्षणासाठीच मी भांडत होतो. त्यामुळे हा हल्ला माझ्यावर नाही तर 5 कोटी मराठ्यांवरचा असल्याचे समजायला हरकत नाही, असेही जाधव म्हणाले. (NCP)
लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तर आपण पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये राहतो का, असा प्रश्न निर्माण होतो. मी पोलिसांना विचारेन भांडारकरला; पण जाईल मी परवानगीसाठी पत्र दिले होते. त्यामुळे मी पोलिसांना विचारेन का परवानगी नाकारली. जर मी कागद घेऊन पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसेच बोलले पाहिजे, विचारांची लढाई आहे विचाराने लढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नामदेवराव जाधव यांनी दिली.
पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये नामदेवराव जाधव हे एका कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. परंतु या कार्यक्रमास कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव भांडारकर इन्स्टिट्यूटकडून परवानगी नाकारली गेली होती. त्यानंतर नामदेवराव जाधव हे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी नवी पेठेतील पत्रकार भवनात गेले होते.
याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याने ते पत्रकार भवनाजवळ जमले आणि नामदेवराव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले. या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी तत्काळ नामदेवराव जाधव यांना संरक्षण दिल्याने पुढील अनर्थ टळला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.