Chhagan Bhujbal, Manoj Jarange  Sarkarnama
पुणे

Manoj Jarange On Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळ निवडणुकीला उभे राहिले तर...', मनोज जरांगेंनी जाहीर केली भूमिका

Nashik Loksabha : छगन भुजबळ यांनी आपला मराठा आरक्षणला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली होती. तर, मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे म्हणून आग्रही होते.

Roshan More

Loksabha Election : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अजुन सुटलेला नाही. मात्र, नाशिकमधून महायुतीचे उमेदवार छगन भुजबळच असतील, असे निश्चित मानले जात आहे. छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणा ओबीसीमधून देण्यास विरोध केला. शिवाय मराठा आंदोलनाच्या वेळी मनोजमनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या शाब्दिक चकमक झाल्या होत्या. आता नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर आपण काय भूमिका घेणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

मराठा समाजाने निवडणुकीच्या संदर्भात आपल्या आपल्या भागात निर्णय घ्यावेत. त्यांना हव्या त्या उमेदवाराला पाठींबा द्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, 'छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )उमेदवार असतील तर काय भूमिका घ्यायची ते आपणच जाहीर करू', असे म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांना इशाराच दिला आहे.

छगन भुजबळ यांनी आपला मराठा आरक्षणला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली होती. तर, मनोज जरांगे (Manoj Jarange) हे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे म्हणून आग्रही होते. नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा उमेदवार म्हणून सुरू झाली त्यावेळी काही गावांमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने होर्डिंग लावत भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नाशिकमधून छगन भुजबळ यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी शिवसेनेचा (शिंदे गट) नाशिकवर दावा कायम आहे. भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे निर्देश भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून देण्यात आले आहेत. मात्र, शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. नाशिकची जागा सोडू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे अजुनही छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT