Parth Pawar Ajit Pawar Sarkarnama
पुणे

चिन्ह अन् पक्ष मिळाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला मेळावा पुण्यात; पार्थ पवारांचं 'शक्ति'प्रदर्शन?

Ajit Pawar Ncp Youth Melava : पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे 'युवा मिशन 2024' युवक मेळावा भरवला आहे.

Akshay Sabale

विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' असल्याचा निकाल मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला. 'घड्याळ' हे चिन्हही अजित पवार गटाला ( Ajit Pawar ) बहाल करण्यात आले. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात युवक मेळावा रविवारी ( 11 फेब्रुवारी ) भरवला आहे. या मेळाव्याची अजित पवारांचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी पाहणी केली. त्यामुळे या मेळाव्याला पार्थ 'ताकद' लावल्यानं गर्दीकडं सगळ्याच्या नजरा लागणार आहेत.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे 'युवा मिशन 2024' युवक मेळावा भरवला आहे. या मेळाव्याला अजित पवारांना समर्थन करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हजर राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळव्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षबांधणी, निवडणूक रणनिती, लोकसंपर्क वाढविण्याचा धडा अजित पवार देण्याची शक्यता आहे. हा मेळावा पॉवरफुल करून 'हम भी किसी से कम नहीं,' हा संदेश देण्यासाठी पार्थ पवार ( Parth Pawar ) यांनी कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर बालेवाडी स्टेडिअम येथे भरणाऱ्या मेळाव्याच्या तयारीची पार्थ पवार यांनी पाहणी केली. या मेळाव्याला पार्थ 'ताकद' लागल्यानं गर्दीकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

"या मेळाव्याला राज्यातून विक्रमी युवक उपस्थित राहणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून युवा शक्तीचं अजित पवारांना समर्थन पुन्हा अधोरेखित होईल. पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातून युवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं मेळाव्यासाठी उपस्थित राहतील," असा विश्वास पार्थ पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होऊन दाखवण्यासाठी थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिरूर मतदारसंघात पूर्ण पवार कुटुंब कामाला लागली आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT