NCP Agitation Sarkarnama
पुणे

Daund NCP : अजितदादांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयात राडा; राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

NCP Agitation प्रांताधिकारी कार्यालयाच्या उद्‌घाटनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे नाव न टाकण्यात आलेले नाही.

प्रफुल्ल भंडारी

Daund News : महायुतीमध्ये पुणे जिल्ह्यात धूसफूस सुरू झाली आहे. दौंड तालुक्यासाठी नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रांताधिकारी कार्यालयाचे उद्‌घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रांताधिकारी कार्यालयासाठी भाजपचे आमदार राहुल कुल यांनी प्रयत्न केले होते. त्या उदघाटनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आज प्रांतधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पलटी करण्याचा प्रयत्न झाला. (NCP's agitation in Provincial Magistrate's Office for name of Deputy Chief Minister Ajit Pawar)

दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे, त्यासाठी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी पुढाकार घेतला होता. पाठपुरावा करून त्यांनी कार्यालय मंजूर करण्यात यश मिळविले होते. दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये १० डिसेंबर २०२३ रोजी महसूलमंत्री विखे- पाटील यांच्या हस्ते स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. पालकमंत्री पवार यांचे नाव असलेली कोनशिला लावण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केली होती. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून त्याची दखल घेण्यात आली नव्हती.

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी करूनही अजित पवार यांच्या नावाच्या कोनशिला लावण्यात न आल्याने वैशाली नागवडे यांच्यासह उत्तम आटोळे, गुरूमुख नारंग, खळदकर, जीवराज पवार, प्रशांत धनवे, आदींनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाचा धिक्कार करीत निषेध आंदोलन सुरू केले. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरूण शेलार या वेळी उपस्थित होते.

या वेळी वैशाली नागवडे यांनी प्रशासनाला जाब विचारला. मात्र, त्याचे उत्तर प्रशासनाकडे नव्हते. कोनशिलेवर अजित पवार यांचे नाव कोणाच्या सूचनेवरून टाकण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT