Solapur Politics : विजयदादाही उतरले मैदानात; माढ्याचा दौरा करीत घेतल्या गाठीभेटी...

Vijayshinh Mohite Patil Visit Madha : आमदार बबनदादा शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या माढ्यात विजयदादांनी गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा भेटी दिल्या आहेत.
Vijayshinh Mohite Patil
Vijayshinh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात माढ्याच्या उमेदवारीवरून मोहिते-पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात वाद रंगला आहे. माढ्यातून लढण्यासाठी मोहिते-पाटील प्रचंड आग्रही आहेत. त्यातच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटीलही आता सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे, त्यासाठी त्यांनी माढ्याची निवड केली असून जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटीला सुरुवात केली आहे. (Visit of Vijay Singh Mohite Patil to Madha Taluka)

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील हे प्रचंड इच्छुक आहेत. मात्र, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचीही पुन्हा दावेदारी आहे, त्यामुळे माढ्यातून कोणाला उतरवावे, असा प्रश्न भाजपश्रेष्ठींपुढे आहे. मोहिते-पाटील यांची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून निंबाळकरांना एक लाखाचे लीड मिळाले होते. त्यामुळे मोहिते-पाटील यांना डावलणे भाजपला तेवढे शक्य वाटत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijayshinh Mohite Patil
Fadnavis Vs Khadse : देवेंद्र फडणवीस सर्वात अपयशी गृहमंत्री; खडसेंनी पुन्हा डिवचले...

उमेदवारीसाठी दावा करतानाच धैर्यशील मोहिते-पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून माढा लोकसभा मतदारसंघात बांधणी करीत आहेत. त्यांच्या जोडीला आता माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटीलही उतरले आहेत. विजयदादांनी माढा तालुक्यात विविध ठिकाणी सांत्वनपर भेटी दिल्या, तसेच काही जुन्या सहकाऱ्यांना भेटून आठवणींना उजाळा दिला.

आमदार बबनदादा शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या माढ्यात विजयदादांनी गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा भेटी दिल्या आहेत. कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी गवळी यांच्या मातोश्रीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. विजयदादांनी गवळी यांच्या घरी सकाळी अकरा वाजता भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, शरद पवार गटाचे नेते संजय पाटील-घाटणेकर यांचे, बंधूंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या घाटणे येथील घरी भेट देऊन घाटणेकर परिवाराचे सांत्वन केले.

Vijayshinh Mohite Patil
Andhare's Controversial Statement : ठाकरे गटाच्या नेत्याही अडचणीत; मालेगावात गुन्हा, श्रीरामांबद्दलचे विधान भोवले...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे सहकारी खैरावचे माजी सरपंच विलासराव देशमुख यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यांचेही सांत्वन विजयदादांनी केले. खैरावला जाताना मोहिते-पाटील यांनी शिवाजीराव कांबळे यांच्या गाडीतून प्रवास केला. त्यानंतर दुपारी अरण येथे माजी प्राचार्य हरिदास रणदिवे यांच्या घरी दुपारचे जेवण केले. त्याठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे यांनी दादांची भेट घेतली. त्यानंतर विजयदादा अकलूजकडे रवाना झाले.

मागील पंधरा दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी टेंभुर्णी येथील एका लग्नकार्यास उपस्थिती लावली होती. त्या वेळी त्यांनी एका पानटपरीवर थांबून कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. मागील पंधरा दिवसांत त्यांनी दोन वेळा एका लग्नाला आणि दुसऱ्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Vijayshinh Mohite Patil
Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतही एकाकी?

माढ्यातून निंबाळकरांना निवडून आणण्याची भाषा करणारे मोहिते-पाटील यांनी शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यातच गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विशेषतः शिंदे यांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांशी मोहिते-पाटील यांच्याकडून विविध कारणांच्या माध्यमातून संपर्क साधला जात असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे माढ्यातून मोहिते-पाटील यांना तिकीट मिळणार काय, अशी चर्चा रंगली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Vijayshinh Mohite Patil
Karmala Politics : पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंना व्हायचंय आमदार; करमाळ्यातून रणशिंग फुंकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com