Pimpri Chinwad Fire  Sarkarnama
पुणे

Pimpri Chinwad : मोठी बातमी! तळवडेत फटाका गोदामाला आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Pimpri Chinchwad Fire News : सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

Deepak Kulkarni

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे फटाका गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या आगीच्या घटनेत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या गोदामात आणखी कामगार अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

तळवडे येथील फटाका गोदामाला शुक्रवारी दुपारी आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच 7 ते 8 रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी सहा कामगारांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. इतर कामगारांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे (Talwade) भागातील ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीने काहीवेळातच रौद्ररुप धारण केलं. आग भडकल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाची गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.पण तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं खरं पण तोपर्यंत आगीत होरपळलेल्या 6 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade)जवान घटनास्थळी येण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली होती. तसेच या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh),पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

तळवडेतील फटाका कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागली झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार असून तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT