NIA Sarkarnama
पुणे

Pune NIA News : सॅलसबरी पार्क परिसरातील तरुण 'एनआयए'च्या ताब्यात..

Amol Sutar

Pune NIA News : पुण्यातील सॅलसबरी पार्क परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने सोमवारी छापा टाकत कारवाई केली. यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल जप्त करण्यात आला. यासोबतच अन्य धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र (Maharashtra) गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट (Bomb Blast) करण्याचा कट रचण्यात आला होता. याच अनुषंगाने हि कारवाई करण्यात आली. ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) छापे टाकले होते.

यामध्ये ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात एनआयएच्या पथकाने कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, याठिकाणी केलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार पुणे (Pune) येथील सॅलसबरी पार्क परिसरात सोमवारी एनआयएच्या पथकाने कारवाई करुन एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल जप्त करण्यात आला.

यापूर्वी याप्रकरणात मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) यांना अटक करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता. आयसिसच्या माध्यमातून देशासह महाराष्ट्रात हशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणासाठी काम केले जाते.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT