Ravindra Dhangekar, Devendra Fadanvis sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar News : लोकसभा उमेदवारीवरून रवींद्र धंगेकर यांचे मोठे विधान, म्हणाले..!

Chaitanya Machale

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या कोणाला उमेदवारी द्यायची, याची चाचपणी करण्यासाठी गुरुवारी एक बैठक झाली. भाजपचे पुण्याचे निरीक्षक माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यामध्ये अनेक इच्छुकांनी पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी या बैठकीत केली.

महाविकास आघाडीत पुण्याची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे लोकसभेसाठी काँग्रेसकडूनदेखील उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हेदेखील लोकसभेसाठी इच्छुक असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी यासाठी तयारीदेखील सुरू केली आहे.

काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने विश्वास ठेवला तर त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ करेल, असे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सातत्याने नऊ वेळा मी निवडणूक लढलो आहे. पक्षाने मात्र अद्याप आपल्याला तयारी करायला सांगितले नसल्याचेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवार ठरविणार

भाजपचे निरीक्षक म्हणून काम करणारे कृपाशंकर सिंह काही काळ काँग्रेसचे मंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचारांचे आरोप आहेत, तेच आता भाजपचा उमेदवार निश्चित करणार असतील तर याचा अर्थ भाजपचा स्तर खालावला आहे, अशी टीकाही आमदार धंगेकर यांनी केली.

रिलायन्सला या सरकारने आणि पालिकेने दत्तक घेतले आहे. त्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. राज्यात अस्तित्वात असलेलं सध्याचं हे सरकार आदानी आणि अंबानीचे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. पुण्यात पब संस्कृती आली नाही पाहिजे. याला आमचा विरोध आहे. नाशिक, संभाजीनगर, दौंड या भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत आहेत, मग पोलिस प्रशासन करत काय आहे? हे पोलिसांचे अपयशच आहे, असेही धंगेकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहरासह संपूर्ण राज्यात सापडत असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरदेखील त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, खाऊ गावात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकले जातात. ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात अद्यापही ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांना पाठीशी घालण्यामध्ये राज्य सरकारचा नक्की काय इंटरेस्ट आहे, याची चौकशी झाली पाहिजे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT