Congress leader Rohit Tilak announces his decision to quit the party and hints at joining Eknath Shinde-led Shiv Sena, citing growing distance with Congress leadership. Sarkarnama
पुणे

Rohit Tilak political move : शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या रोहित टिळकांवर काँग्रेसकडून जिव्हारी लागणारा वार; म्हणाले, 'लोकमान्य टिळकांचा वारसाच त्यांनी...'

Arvind Shinde statement Congress News : टिळक कुटुंबातील राजकीय वारसा असलेले नेते रोहित टिळक लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : टिळक कुटुंबातील राजकीय वारसा असलेले नेते रोहित टिळक लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांनी स्वतःच घोषणा केली आहे. सध्या ते काँग्रेसमध्ये असून लवकरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना रोहित टिळक यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यसभेची उमेदवारी देऊ केली होती. मात्र पुढून महाविकास आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता दिसतो, त्यामुळे पुढे गोष्टी कशा घडतात, हे पाहून आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

यानंतर आता काँग्रेसने (Congress) देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, 'टिळक कुटुंब हे पूर्वीपासून काँग्रेससोबत राहिले आहे. मात्र रोहित टिळक यांना आम्ही टिळक घराणे मानत नाही. त्यांना आम्ही व्यक्तिगत मानतो. जर काँग्रेसमध्ये कोणाला राहायचे असेल तर त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधील असणे आवश्यक आहे.'

ज्या दिवशी रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. ज्यांच्या वर मोठमोठ्या दंगलीचे गुन्हे दाखल आहेत त्यांना पुरस्कार दिला. त्याच वेळेला तुम्ही लोकमान्य टिळक यांचा वारसा घालवलेला आहे, असे आम्ही मानतो.

रोहित टिळक यांनी पक्ष सोडून जाण्या अगोदरच जेव्हा त्यांनी मोदी यांना पुरस्कार दिला, तेव्हापासूनच त्यांना काँग्रेसने दूर केले होते. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही स्टेज देखील शेअर करत नव्हतो. पण त्यांची विचारधारा ही वेगळी होती. जिथे त्यांना पोळी दिसेल तिथे ते पळत असतात, अशा शब्दांत अरविंद शिंदे यांनी रोहित टिळक यांच्यावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT